
महाराष्ट्र अजूनही मतदानात मागेच...
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पाचव्या टप्प्यात देशातील ४९ जागांवर मतदान होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात दुपारी १ वाजेपर्यंत ३६.७३ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत मतदानात लडाख सर्वात आघाडीवर असून या ठिकाणी ५२.०२ टक्के मतदान झाले आहे. तर महाराष्ट्रात मात्र मतदानाचा प्रतिसाद थंड आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत २७.७८ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची राज्यनिहाय टक्केवारी -
बिहार – ३४.६२
जम्मू काश्मीर- ३४.७९
झारखंड- ४१.८९
लडाख- ५२.०२
महाराष्ट्र- २७.७८
ओडिशा- ३५.३१
उत्तरप्रदेश- ३९.५५
पश्चिम बंगाल- ४८.४१
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला महाराष्ट्रातील १३ लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात २७.७८% इतके मतदान झाले. जाणून घ्या कोणत्या ठिकाणी किती टक्के मतदान झाले..
भिवंडी- २७.३४ %
धुळे- २८.७३ %
दिंडोरी- ३३.२५ %
कल्याण- २२.५२ %
उत्तर मुंबई- २६.७८ %
उत्तर मध्य मुंबई- २८.०५%
उत्तर पूर्व मुंबई- २८.८२ %
उत्तर पश्चिम मुंबई- २८.४१ %
दक्षिण मुंबई- २४.४६ %
दक्षिण मध्य मुंबई- २७.२१%
नशिक- २८.५१ %
पालघर- ३१.०६ %
ठाणे- २५.०५ %