IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या चार टीम्स आहेत. हंगामातील फायनल सामना २६ मेला चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळवला जाईल.


आता चाहत्यांसाठी खुशखबर आहे की आयपीएल २०२४च्या फायनल तिकीटांची विक्री सुरू झाली आहे. येथे जाणून घ्या तुम्ही फायनल सामन्याचे तिकीट कसे खरेदी करू शकता. याशिवाय येथे सर्वात स्वस्त आणि सगळ्यात महागडे तिकीट कितीचे असेल.


KKR, SRH, RR आणि RCB यातील कोणतेही २ संघ फायनलला प्रवास करतील. आता आयपीएल २०२४च्या फायनल तिकीटाची विक्री सुरू झाली आहे. याची सुरूवातीची किंमत ३५०० रूपये ठेवण्यात आली आहे. स्टँड्सच्या हिशेबाने सगळ्यात महागड्या तिकीटाची किंमत ७५०० रूपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्या रुपे कार्ड होल्ड करणारे लोक हे खरेदी करू शकतात. तर इतर लोकांसाठी तिकीटांची विक्री उद्यापासून सुरू होणार आहे.



कसे खरेदी कराल फायनलचे तिकीट


तुम्ही Paytm Insider मोबाईल अॅपवर जाऊन तिकीट खरेदी करू शकता. तिकीट बुक करण्याची प्रक्रिया अशा प्रकारे आहे. सगळ्यात आधी Paytm Insider एप डाऊनलोड करा. यानंतर चेन्नई शहर निवडा. कारण शेवटचा सामना चेन्नईच्या एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये खेळवला जाईल. शहरावर क्लिक केल्यानंतर आयपीएल २०२४ फायनलचा पर्याय निवडा आणि क्लिक करा. फायनल मॅचच्या टॅबवर क्लिक केल्यानंतर Buy Now'चा पर्याय दिसेल. यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार स्टेडियममध्ये उपलब्ध सीटपैकी कोणतीही सीट निवडू शकता. जागांची संख्या सेट केल्यानंतर तुम्हाला अॅड टू कार्ट वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना