Sushant Divgikar : सुशांत दिवगीकरच्या घरात लागली आग; अ‍ॅवॉर्ड्ससह काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक!

कुटुंबीय सुरक्षित मात्र मालमत्तेचे नुकसान


मुंबई : ‘बिग बॉस’ रिअ‍ॅलिटी शोमधून (Bigg Boss reality show) प्रसिद्धी मिळवलेला मॉडेल आणि गायक सुशांत दिवगीकरच्या (Sushant Divgikar) घरात शनिवारी रात्री आग लागली. सुशांतच्या मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरातील एसीचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. शनिवारी रात्री ११च्या सुमारास ही घटना घडली. काही क्षणांत आग पसरल्याने घरातील मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने सुशांत व त्याचे कुटुंबिय सुखरुप आहेत. आगीच्या घटनेने त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे.


सुशांत दिवगीकरच्या घरातील या स्फोटाबाबत त्याच्या मॅनेजरने माहिती दिली. त्याने सांगितले की, “घरातील हॉलमध्ये सगळे जण शनिवारी रात्री जेवण करत असताना एसीमध्ये स्फोट होऊन आग लागली. मग लगेचच ही आग स्वयंपाकघरात आणि ऑफिसमध्ये पसरली. या घटनेत अवॉर्ड्स, घरातील काही उपकरणं, फर्निचर आणि काही महत्त्वाची कागदपत्रे जळाली आहेत. सुशांतचा मेकअप व त्याचे कपडेही या घटनेत जळाले आहेत,” असं मॅनेजरने सांगितलं.


“घरातील बरंच सामान जळालं आहे, सुशांतचं मोठं नुकसान झालं आहे पण सुदैवाने घरातील सर्व सदस्य सुखरुप आहेत. सुशांत सध्या त्याच्या आई-वडिलांच्या घरी राहतो. या घटनेनंतर त्याला मोठा धक्का बसला आहे, घराचे खूप मोठे नुकसान झाले आहे, मात्र कोणत्याही सदस्याला इजा झालेली नाही,” अशी माहिती सुशांतच्या मॅनेजरने दिली.


सुशांत हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो त्याचे फोटो व रील्स इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. अभिनेत्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सुशांत जुलै २०१४ मध्ये मिस्टर गे इंडियाचा विजेता ठरला होता. मग त्याने मिस्टर गे वर्ल्ड २०१४ मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तसंच त्याच्या पुरुष व महिला अशा दोन्ही आवाजांतील गायकीसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने दोन आवाजात गायलेलं 'अप्सरा आली' हे मराठी गाणं चाहत्यांना विशेष आवडतं.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक