Yami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा!

  105

'या' शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म


मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि तिचा पती दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांनी त्यांच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. यामीच्या घरी चिमुकल्या पावलांनी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. यामीला अक्षय तृतीयेच्या (Akshay Tritiya) दिवशी म्हणजेच १० मे ला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. याबाबत या जोडप्याने आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत ही बातमी सांगितली आहे.


'आर्टिकल ३७०' या चित्रपटाच्या शूटिंगवेळी यामी गरोदर होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये ती सहभाग घेऊ शकली नाही. आपण गरोदर असल्याने चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये सहभागी होणार नसल्याचे यामीने जाहीर केले होते. यामीने गुड न्यूज दिल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आज यामीने सोशल मीडियावर आपल्याला बाळ झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.


यावेळेस उभयतांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये यामी ज्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती त्या हॉस्पिटलच्या स्टाफ आणि डॉक्टर्सचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, 'आम्ही सूर्या हॉस्पिटलमधील अपवादात्मकपणे समर्पित आणि अद्भुत वैद्यकीय व्यावसायिकांचे, विशेषत: डॉ. भूपेंद्र अवस्थी आणि डॉ. रंजना धनू यांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो, ज्यांच्या कौशल्याने आणि अथक प्रयत्नांमुळे हा आनंदाचा प्रसंग शक्य झाला.


आम्ही पालकत्वाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना, आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही आतुरतेने अपेक्षा करतो. त्याने गाठलेल्या प्रत्येक मैलाच्या दगडासह, तो आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच आपल्या प्रिय राष्ट्रासाठी अभिमानाचा दीपस्तंभ बनेल अशी आम्हाला आशा आणि विश्वास आहे'. यामीने आपल्या बाळाचं नाव 'वेद्विद' ठेवलं आहे. चाहते या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.




Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई