काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी

काँग्रेस आणि झामुमो यांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही


पंतप्रधान मोदींनी विरोधकांना झोडपले!


जमशेदपूर : झारखंडमधील जमशेदपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस (Congress) आणि झारखंड मुक्ती मोर्चावर (Jharkhand Mukti Morcha) जोरदार हल्लाबोल केला. "काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांनी झारखंडला लुटण्याची एकही संधी सोडली नाही. काँग्रेस ही भ्रष्टाचाराची जननी आहे. काँग्रेस आणि झामुमोच्या लोकांना विकासाची फिकीर नाही. त्यांचा संबंध फक्त भ्रष्टाचार आणि खोटे बोलण्याशी आहे. काँग्रेस आणि झामुमोने आपल्या घरात काळ्या पैशाचा ढीग ठेवला आहे," अशा शब्दांत पंतप्रधान मोदींनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला.


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "काँग्रेस आणि झामुमोच्या लोकांना विकासाचा एबीसीडी सुद्धा माहित नाही. गरिबांच्या मालमत्तेचा एक्स-रे काढणे, एससी-एसटी-ओबीसीचे आरक्षण हिसकावणे, मोदीजींना रोज शिव्या देणे हे त्यांचे काम आहे. या पलीकडे ते विचार करू शकत नाहीत."





"झारखंडमध्ये झामुमोने जमीन घोटाळा केला. त्यांनी गरीब आदिवासींच्या जमिनी बळकावल्या, लष्कराच्या जमिनी बळकावल्या. त्यांच्या घरातून जप्त झालेल्या चलनी नोटांचे डोंगर तुमच्याकडून लुबाडलेले आहेत. या अप्रामाणिक लोकांच्या घरात दडवून ठेवलेला पैसा आता मोदी शोधून काढतोय. मी हे पैसे सरकारी तिजोरीत नेण्यासाठी वसूल करत नाही तर मी हे सर्व पैसे ज्यांच्या मालकीचे आहेत, त्या गरीब लोकांना परत करण्याचा मार्ग शोधत आहे. ही मोदींची गॅरंटी आहे," असा विश्वास त्यांनी लोकांना दिला.


"काँग्रेस पक्ष उद्योजकांना देशाचे शत्रू मानतो. जे उद्योगपती त्यांना पैसे देत नाहीत, त्यांच्यावर ते हल्ला करतात, म्हणजेच काँग्रेस आणि झामुमोसारख्या पक्षांना देशातील उद्योगांची चिंता नाही. त्यांचे नेते असे उघडपणे सांगतात. ते त्यांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीशी संबंधित आहेत. काँग्रेसचे राजपुत्र उद्योग, उद्योगपती आणि गुंतवणुकीला रोज विरोध करतात. असे असताना येत्या काळात कोणता उद्योगपती त्यांच्या राज्यात जाऊन भांडवल गुंतवणार आहे? त्या राज्यातील तरुणांचे काय होणार?" असा सवालही मोदींनी केला.

Comments
Add Comment

बिहारमध्य राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या