CSK vs RCB: आज बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आमने-सामने आले. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरुसाठी विराट कोहलीने 29 चेंडूत 47 धावा, फाफ डू प्लेसिसने 39 चेंडूत 54 धावा, रजत पाटीदारने 23 चेंडूत 41 धावा आणि कॅमेरून ग्रीनने 17 चेंडूत नाबाद 38 धावा केल्या. मिचेल सँटनर वगळता चेन्नईच्या सर्व गोलंदाजांची धुलाई झाली. बंगळुरूने 20 षटकांत 4 गडी गमावून 218 धावा केल्या. बंगळुरुला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला 200 धावांपर्यंत थांबवावं लागेल.
बंगळुरुने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नई मागे पडताना दिसली. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज खातं खोलायच्या आधीचं परतला. रचिन रविंद्राने ३७ चेंडुत ६१ धावा बनवत संघाचा खेळ सावरला. अजिंक्य रहाणेने देखील आक्रमक सुरुवात केली. मात्र ३३ धावांवर त्याला परतावं लागलं. चेन्नईचा युवा फलंदाज शिवम दुवे विशेष खेळी करु शकला नाही. १५ चेंडु खाऊन मात्र ७ धावा बनवुन तो परतला. त्यानंतर रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीने संघाची धुरा सांभाळली.
दोन्ही अनभुवी खेळाडुंनी संघासाठी अर्धशतकीय भागीदारी केली. मात्र शेवटच्या शतकात पहिल्या चेंडुवर षटकार मारुन दुसऱ्या चेंडुवर धोनी झेलबाद झाला. धोनीने १३ चेंडुत २५ धावा बनवल्या. जडेजाने २२ चेंडुत ४२ धावा बनवल्या, पण संघाला विजय मिळवुन देण्यात अपयशी ठरला. बंगळुरु हा सामना जिंकुन क्वालीफाय करणारी चौथी टीम ठरली. त्याचबरोबर बंगळुरुने सलग सहावा सामना जिंकुन स्पर्धेतील आपलं वर्चस्व कायम केलं आहे.