Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाईचा प्रभाव

Mumbai Water Shortage : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! कडाक्याच्या उन्हात पाणीटंचाईचा प्रभाव

'या' भागातील चक्क १६ तास पाणीपुरवठा खंडित


मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत होता, मात्र आता पुन्हा वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असताना मुंबईकरांसमोर आता आणखी एक संकट उभं राहणार आहे.


मुंबई शहरातील महत्त्वाच्या भागात २२ ते २३ मे दरम्यान पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक कार्यालयं आणि रहिवासी भाग असणाऱ्या मुंबईतीत या भागातील नागरिक, सदनिकांना प्रशासनाच्यावतीने पाणी जपून वापरण्याचं आणि पाण्याचं नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांना आता उन्हात अंगाची लाही लाही होत असताना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, विले-पर्ले, गोरेगाव आणि ओशिवरासह नजीकच्या भागात २२ मे ते २३ मे दरम्यान १६ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. नव्यानं बसवण्यात आलेल्या १५०० मिमी व्यासाच्या आणि १२०० मिमी व्यासाच्या (पार्ले क्षेत्र) दोन महत्वाच्या जलवानहिनी जोडण्यासाठी म्हणून पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बी डी सावंत रोड, सी जी रोडपासून पुढे सी जी रोड आणि अंधेरीतील सहार रोड पूर्व पर्यंतच्या टप्प्यामध्ये पालिकेकडून हे काम हाती घेण्यात येणार आहे.


२२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून पालिका कर्मचारी हे काम हाती घेणार असून, त्याच मध्यरात्रीनंतर १ वाजता हे काम पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पालिकेकडून हे काम पूर्ण होताच वेरावली जलाशय १, २ आणि ३ मधील पाणीपातळी सुधारणार असून, त्याचा फायदा अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले भागाला होणार आहे. दरम्यान या संपूर्ण जोडणी काम सुरु असण्याच्या प्रक्रियेमुळे के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण भाग सर्वाधिक प्रभावित होणार असून, तेथील पाणीपुरवठा बंद राहील.



'या' भागांमधील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम



  • पी दक्षिण विभाग - बिंबीसार नगर, बांद्रेकरवाडी, वनराई, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) भाग (सायंकाळी ७ ते रात्री ९.३० दरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा) राम मंदीर मार्ग, गोरेगाव (पश्चिम) (सायंकाळी ७.४५ ते रात्री ९.१५)

  • के पश्चिम विभाग – सी. डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धाकुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी बाजार, भर्डावाडी, आंब्रे गार्डन पंप (सकाळी ७.३० ते दुपारी १२), जुहू-कोळीवाडा, जुहू तारा मार्ग ( सकाळी ९ ते सकाळी ११), जुहू-कोळीवाडा झोन, देवराज चाळ, स्वामी विवेकानंद मार्ग (जेव्हीएलआर ते जोगेश्वरी बस आगार) (सकाळी ११ ते दुपारी १) एस. व्ही. मार्ग जोगेश्वरी भाग – २, के पश्चिम (पाणीपुरवठा बंद), चार बंगला, डी. एन. नगर, जुहू-वेसावे जोडरस्ता (दुपारी १२.१५ ते २.१० चार बंगला झोनमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा), विलेपार्ले (पश्चिम), लल्लूभाई पार्क, लोहिया नगर, विलेपार्ले गावठाण, मिलन सबवे, संपूर्ण जुहू परिसर, व्ही. एम. मार्ग, नेहरू नगर (दुपारी २.३० ते सायंकाळी ४.३०)


मोरागाव, जुहू गावठाण (दुपारी २.३०ते सायंकाळी ४.४०), यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (रात्री ९.३० ते रात्री १२), गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर (रात्री १० ते मध्यरात्री १२.३०)




  • के पूर्व विभाग – त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, कलेक्टर कॉलनी, मातोश्री क्लब, दुर्गा नगर (सकाळी ८ ते ९), दुर्गा नगर, सारीपुत नगर (सकाळी १० ते दुपारी १२), दत्त टेकडी, ओबेराय स्प्लेंडर, केलती पाडा, गणेश मंदिर परिसर, जोगेश्वरी – विक्रोळी जोडरस्ता (सकाळी ९ ते सकाळी ११), बांद्रेकरवाडी, फ्रान्सिसवाडी, मखरानीपाडा, सुभाष मार्ग, चाचा नगर (सकाळी ११ ते दुपारी २), वांद्रे भूखंड, हरी नगर, शिवाजी नगर, पास्कल वसाहत, शंकरवाडी (दुपारी १.३० ते दुपारी ३.४०), विशाल सभागृह, वर्मा नगर, कामगार कल्याण, मांजरेकरवाडी, बिमा नगर, पंथकी बाग, तेली गल्ली, हाजी जुमान चाळ, कोल डोंगरी, जीवा महाले मार्ग, साई वाडी, जीवन विकास केंद्र, शिवाजी नगर, संभाजी नगर, हनुमान नगर, श्रद्धानंद मार्ग, नेहरू मार्ग, तेजपाल मार्ग, शास्त्री नगर, आंबेडकर नगर, काजूवाडी, विलेपार्लेचा बहुतांश भाग (सायंकाळी ५ ते रात्री ८), पंप हाऊस, विजय राऊत मार्ग, पाटीलवाडी, हंजर नगर, झगडापाडा, पारसी वसाहत, जिजामाता मार्ग, गुंदवली हिल, आशीर्वाद चाळ (सायंकाळी ५ ते रात्री ८) जुना नागरदास मार्ग, मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, पारसी पंचायत मार्ग, आर. के. सिंग मार्ग, निकोलसवाडी परिसर (रात्री ८ ते रात्री १०.३०)

Comments
Add Comment