Konkan Railway Recruitment : कोकण रेल्वेत नोकरीची संधी

मुंबई : कोकण रेल्वेकडून नोकरी भरतीची जाहिरात (Konkan Railway Recruitment) देण्यात आली आहे. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणार्‍या तरूण तरूणींसाठी ही एक नामी संधी आहे.


कोकण रेल्वेने (Konkan Railway) जारी केलेल्या परिपत्रकामध्ये AEE/कॉन्ट्रॅक्ट, डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल, टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल, ज्यु. टेक्निकल असिस्टंट/सिव्हिल अशा विविध पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. यामध्ये उमेदवाराला ५६ हजार प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे. एकूण ४२ जागांसाठी ही नोकरभरती होणार आहे. यासाठी वॉक ईन इंटरव्ह्यू होणार आहेत.


कोकण रेल्वे मध्ये या भरतीसाठी उमेदवाराकडे इंजिनियरिंगची पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच इंजिनियरिंगच्या पदवी मध्ये विद्यार्थ्यांना किमान ६०% गुण आवश्यक आहेत.


एका वर्षासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी अधिकृत वेबसाईट konkanrailway.com वर जाऊन आपला अर्ज अंतिम मुदतीपूर्वी भरायचा आहे. ०५, १०, १२, १४, १९, २१ जून २०२४ या दिवशी उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन केले आहे.



येथे पहा नोकर भरतीचे परिपत्रक आणि नियम

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये