Public sector Banks : सार्वजनिक क्षेत्रातील ‘या’ बँकांना दिलासा; वर्षभरात कमवला कोट्यावधींचा नफा!

Share

जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : नवे आर्थिक वर्षात अनेक बँकांकडून अनेक बदल करण्यात आले होते. याच नव्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या महिन्यात भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी एक आनंदाची बातमी हाती लागली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मोठ्या प्रमाणात नफा (Profit) कमवला आहे. या बँकांनी मागील वर्षभरात १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवला आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती चांगली असल्याचे दिसून येते.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिकडच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. २०२२-२३ मध्ये एकूण नफा हा १,०४,६४९ कोटी रुपयांचा मिळाला आहे. गेल्या वर्षभरात सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांपैकी ११ बँकांच्या नफ्यात वाढ झाली असून केवळ एका बँकेची घट झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

‘या’ बँकेच्या नफ्यात किती झाली वाढ

  • दिल्लीच्या पंजाब नॅशनल बँकेचा निव्वळ नफा २२८ टक्क्यांनी वाढून ८२४५ कोटी रुपये झाला आहे.
  • युनियन बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात ६२ टक्क्यांची वाढ झालीय. एकूण नफा हा १३,६४९ कोटी रुपये झाली आहे.
  • सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा नफा ६१ टक्क्यांच्या वाढीसह २,५४९ कोटी रुपये झाला आहे.
  • बँक ऑफ इंडियाच्या नफ्यात ५७ टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकेनं ६,३१८ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
  • बँक ऑफ महाराष्ट्रच्या नफ्यात ५६ टक्क्यांची वाढ झालीय. या बँकेनं ४०५५ कोटी रुपयांचा नफा मिळवला.
  • चेन्नईच्या इंडिया बँकेने ५३ टक्क्यांच्या वाढीसह ८,०६३ कोटी रुपयांचा नफा मिळवला.
  • बँक ऑफ बडोदाने आणि कॅनरा बँकेनं देखील १०,००० कोटींहून अधिक नफा मिळवला आहे.

स्टेट बँक इंडिया आघाडीवर

२०२३-२४ या आर्थिक वर्षात मिळवलेल्या नफ्यात स्टेट बँक इंडिया (SBI) ही बँक सर्वात आघाडीवर आहे. १,४१,२०३ कोटी रुपयांच्या नफ्यात स्टेट बँक इंडियाचा वाटा हा ४० टक्क्यांहून अधिक आहे. एसबीआयने २२ टक्के अधिक नफा मिळवला असून हा नफा ६१,०७७ कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.

या बँकेच्या नफ्यात झाली घट

दरम्यान, पंजाब आणि सिंध बँकेचा वार्षिक निव्वळ नफा ५५ टक्क्यांनी घसरुन या बँकेचा नफा ५९५ कोटी रुपयांवर आला आहे. त्यामुळे या बँकेच्या नफ्यात मोठी घट झाली आहे.

Recent Posts

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

10 minutes ago

PahalgamTerrorist Attack : सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून पंतप्रधान मोदी भारतात दाखल

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…

38 minutes ago

PahalgamTerrorist Attack : डोंबिवलीच्या तीन जणांसह महाराष्ट्राचे चार पर्यटक ठार

पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…

1 hour ago

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

6 hours ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

7 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

7 hours ago