मुंबई : तंत्रज्ञान क्षेत्रात जग बरंच पुढे जात आहे. गुगल, अॅपलसारख्या अनेक कंपन्यांकडून नवनवीन तंत्रज्ञान विविध रुपात जगासमोर आणलं जातं. अशा तंत्रज्ञान क्षेत्रात जग पुढे जात असताना सध्या सर्वत्र नुकत्याच पार पडलेल्या गुगलच्या इवेंटची (Google I/O) चर्चा सुरु आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी यावेळी जेमिनी (Gemini) संबंधित कित्येक प्रॉडक्ट्स आणि फीचर्सची घोषणा केली. त्यातच जेमिनी हे गुगलचं एआय मॉडेल आहे ज्याने इवेंटमध्ये सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या कार्यक्रमाची सुरुवात जेमिनी संदर्भापासून केली. जगभरात सुमारे दोन अब्ज लोक जेमिनी वापरत असल्याचा दावा सुंदर पिचाई यांनी केला. गुगलच्या या मेगाइवेंटमध्ये एआयपासून गुगलचं व्हिडीओ जनरेटीव एआय मॉडेल VEO लाँच केले आहे. याशिवाय जेमिनी इन गुगल कॅमेरा आणि फोटोज, जेमिनी प्रो, जेमिनी अॅप या सुविधाही लाँच केल्या आहेत.
याशिवाय कंपनीकडून या इवेंटमध्ये Project Astra सुद्धा लाँच केलं आहे. गुगलच्या या नव्या प्रोजेक्टअंतर्गत भविष्यातील एआय असिस्टंट तयार करण्यासाठी केला जाईल. गुगलचं हे नवं फिचर साधारण, OpenAI आणि GPT 4o सारखंच असून, तुमच्या मोबाईल कॅमेरामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक लहानमोठ्या गोष्टीची सविस्तर माहिती हे टूल देणार आहे.
गुगलचं हे असिस्टंट टूल कॅमेरामध्ये दिसणाऱ्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून भविष्यात तो डेटा गरज पडल्यास वापरताना दिसणार आहे. म्हणजेच हे एआय टूल कॅमेरामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीसंदर्भात सविस्तर माहिती देणार आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणताही प्रश्न विचारल्यास त्या संदर्भातील सर्व माहिती देण्याचं कामही हे टूल करणार आहे.
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी (Bell's palsy) हा आजार झाला…