Salman Khan House firing : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणात सहावा आरोपी ताब्यात!

मुंबई पोलिसांचे तपासयंत्र वेगाने सुरु


मुंबई : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर १४ एप्रिल रोजी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi) याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. यानंतर मुंबई पोलिसांनी हरियाणातील (Hariyana) फतेहाबाद येथून आणखी एकाला अटक केली आहे. हा सहावा आरोपी आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली होती. त्यानंतर आज हरियाणामध्ये ही कारवाई करण्यात आली.


हरपाल सिंग (Harpal Singh) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो ३७ वर्षांचा आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी हरपाल सिंगने या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचव्या आरोपी मोहम्मद रफिक चौधरीला आर्थिक मदत केली होती आणि रेकी करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. आरोपीला आज विशेष मकोका न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



आठवडाभरापूर्वी राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक


मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ७ मे रोजी राजस्थानमधून पाचव्या आरोपीला अटक केली होती. राजस्थानमधून अटक केलेल्या आरोपीचे नाव मोहम्मद रफिक चौधरी असे आहे. चौधरी याने या प्रकरणात अटक केलेल्या सागर पाल आणि विकी गुप्ता या दोन शूटर्सना पैसे आणि रेकी करण्यासाठी मदत केली होती.


सलमान खानच्या घराजवळ १४ एप्रिल रोजी गोळीबार करण्यात आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अत्यंत वेगाने हालचाली करत आरोपींना ताब्यात घेतले. दरम्यान, यातील एका आरोपीने अनुज थापनने (Anuj Thapan) १ मे रोजी तुरुंगात आत्महत्या केली. सध्या या प्रकरणाचा आणखी तपास सुरु आहे. हरपाल सिंगकडून आणखी काय खुलासे होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

Central Railway's Ashadhi Special Train : आषाढी वारीसाठी मध्य रेल्वेची भाविकांना भेट! दादर-पंढरपूरदरम्यान धावणार 2 विशेष गाड्या; आरक्षणाला सुरुवात

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य

Maharashtra Government : राज्य सरकारकडून ग्रामपंचायतींना अर्थबळ!

जन सुविधा निधीत मोठी वाढ; दिवाबत्तीसह सौरऊर्जा आणि क्रीडांगण विकासासाठी मिळणार विशेष अनुदान मुंबई(Mumbai) :

Hospital Facilities : रुग्णांच्या नातेवाईकांचे हाल थांबणार

राज्यातील ६ मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये ‘धर्मशाळा’ उभारणार मुंबई(Mumbai) : दुर्गम तसेच ग्रामीण भागातून मुंबई,

Devendra Fadnavis : मराठी भाषा आणि बोलींच्या संवर्धनाला मिळणार गती

कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश; गडचिरोलीत नाट्य संकुल उभारणार मुंबई : मराठी भाषा, साहित्य

Central Railway Diva Station : 'दिवा-डोंबिवलीला उतरता येणार नाही?' १५ डब्यांच्या लोकलबाबत व्हायरल मेसेज खोटा; मध्य रेल्वेने दिले मोठे स्पष्टीकरण

मुंबई : मध्य रेल्वेने उपनगरीय प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि गर्दीमुक्त करण्यासाठी सोमवारपासून १५

Mumbai News : मुंबईत २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी

५ पेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास मनाई; सभा, संमेलने, मिरवणुका काढण्यास बंदी मुंबई(Mumbai) : कायदा व सुव्यवस्था