
जाणून घ्या आजचे दर काय?
मुंबई : सध्या देशभरात लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. अशावेळी सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ होत असते. त्यातच सोनं-चांदीच्या वाढत्या दरामुळे खरेदीदारांच्या खिशाला चांगलाच फटका बसला होता. मात्र आता सोनं चांदींचे दागिने खरेदी करणाऱ्यासाठी आनंदाची बातमी मिळत आहे. सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गगनाला भिडत असणारे हे सोनं-चांदीचे दर उतरत असल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या सध्याचे सोनं चांदीचे काय आहेत दर .
मिळालेल्या माहितीनुसार, आज भारतीय वायदे बाजारात सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. भारतीय वायदे बाजारात (MCX) सोन्याच्या दरात ४३० रुपयांची घट झाली आहे. प्रति १० ग्रॅमसाठी सोन्याचा दर ७२,८२० रुपये इतका आहे. मागील सत्रात सोन्याचा दर ७३,२५० वर बंद झाला होता. तर, आज चांदीच्या दरात मात्र ५०१ रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीचा दर एक किलोसाठी ८५,३८७ रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. तर, मागील सत्रात तो ८४,८८६ रुपये इतका होता.
मुंबई - पुण्यातील सोन्याचे दर
- २२ कॅरेट - ६६,७५० रुपये
- २४ कॅरेट - ७२,८२० रुपये
- १८ कॅरेट - ५४,६२० रुपये