Eknath Shinde : त्यांना सावरकर नकोय, औरंगजेब हवाय!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा सेनेवर डागली तोफ


मुंबई : खऱ्या-खोट्या शिवसेनेबद्दल बोलायचे झाल्यास मी एवढेच सांगेन की, आम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे विचार पुढे नेत आहोत. आम्ही बाळासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने चाललेलो आहोत. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे हे ज्या गोष्टी बाळासाहेबांना मान्य नव्हत्या, नेमक्या त्याच गोष्टी करत आहेत. त्यांना सावरकर नको तर औरंगजेब हवा आहे. त्यांची विचारधारा बदलली आहे. लोक मतदान करताना या गोष्टीचा नक्कीच विचार करतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी करताना उबाठा सेनेवर तोफ डागली आहे.


शिवसेना (Shivsena) पक्ष फुटल्यापासून दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच आम्हीच खरी शिवसेना आहोत, असा दावा करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की, आमचा पक्ष हीच खरी शिवसेना आहे, कारण आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालत आहोत. आम्ही बाळासाहेबांचा विचार सोडलेला नाही. मात्र उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या गटाने बाळासाहेबांच्या विचारांना डावलून औरंगजेबाचे विचार जवळ केले आहेत. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसचा नेहमी विरोध केला, उद्धव ठाकरे हे त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केला आहे.



डॉ. एकनाथ शिंदेंमुळे त्यांच्या मानेवरचा उतरला पट्टा


आम्ही विचारधारेसह विकासासाठी काम करत आहोत. आम्ही त्यांच्यासारखे निष्क्रिय नाही. आम्ही केवळ खुर्चीवर बसून फेसबूक लाईव्ह करत नाही. घरात बसून राज्य चालवता येत नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानात उतरावं लागतं. मुळात लोक कोणाला मत देतील? त्यांची कामं करणाऱ्याला की घरी बसणाऱ्याला? त्यांनी (उद्धव ठाकरे) केवळ कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला आहे.


” परंतु, उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात राजकीय प्रचारसभा घेत आहेत. प्रचारफेऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत. या सगळ्याला केवळ डॉ. एकनाथ शिंदे जबाबदार आहेत. त्यांच्या मानेवरचा पट्टा मी उतरवला आहे, याचं श्रेय मला द्यायला हवे, मी स्वतःच्या फायद्यासाठी हे सगळं केलं नाही. केवळ महाराष्ट्राच्या विकासासाठी हे पाऊल उचलले'' असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.


Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे