DC vs LSG: दिल्लीच्या विजयाने राजस्थान क्वालीफाय, लखनौचा १९ धावांनी पराभव...

DC vs LSG:  दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा प्लेऑफसाठीचा संघर्ष कायम आहे. लखनौ आणि दिल्ली आज आमने-सामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजुने लागला. लखनौचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याला हवा होता.


जेक फ्रेझर मॅकगुर्क आणि अभिषेक पोरेल ही जोडी दिल्लीकडुन सलामीसाठी मैदानात उतरली होती. पण पहिल्या षटकातच दिल्लीला धक्का बसला. जेक फ्रेझरला दुसऱ्या चेंडुवरच कोणत्याही धावा न बनवता बाद झाला. पण अभिषेक पोरेल आणि शाई होप आक्रमक खेळी केली. या जोडगोळीने ९२ धावांची भागीदारी केली. अभिषेक पोरेलने ३३ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकाराच्या मदतीने ५८ धावा केल्या. शाई होप २३ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. ऋषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र २३ चेंडूत ३३ धावा करुन तो बाद झाला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल यांनी शेवटच्या षटकात जोरदार फटकेबाजी केली. स्टब्सने २२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ४ गडी गमवून २०८ धावा केल्या आणि विजयासाठी २०९ धावांचं आव्हान दिलं.


दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सलामीवीर विशेष खेळी करण्यात अयशस्वी ठरले. डि कॉक १२ धावांवर तर केएल राहुल ५ धावा बनवुन बाद झाला. त्यानंतर आलेले फलंदाज देखील खास काही करु शकले नाहीत. स्टॉयनिस ५ धावा बनवुन परतला. तर दिपक हुडाला खातं देखील उघडता आलं नाही. मात्र त्यानंतर आलेल्या निकोलस पुरनने संघासाठी आक्रमक खेळी केली. २७ चेंडुत ६१ धावा बनवुन त्याने संघाला सामन्यात परत आणले.


पुरन बाद झाल्यानंतर सामना दिल्लीच्या पक्षात आला असं वाटत असताना, अरशद खानने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत आक्रमक खेळी केली. सातव्या नंबरवर आलेल्या अरशदने अर्धशतक ठोकत संघाला आव्हानाच्या अगदी जवळ आणले. पण अरशदची खेळी संघाला विजयी बनवु शकली नाही. दिल्लीसाठी ईशांत शर्माने सर्वाधिक म्हणजेच ३ गडी बाद केले. लखनौ २० षटकात १८९ धावा बनवु शकला. दिल्लीचा तब्बल १९ धावांनी विजय झाला.


लखनौने हा सामना गमावल्याने प्लेऑफचं गणित खूपच किचकट झालं आहे. काहीही न करता राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचले. तर लखनौ सुपर जायंट्सचा कमी नेट रनरेटमुळे आरसीबी, चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीलाही त्याचा नकळत फायदा झाला आहे.

Comments
Add Comment

FIFA World Cup 2026 Morocco vs Scotland : सायबारीचा विक्रमी गोल, मोरोक्कोची स्कॉटलंडवर मात; बाद फेरीकडे दमदार वाटचाल

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत मोरोक्कोने शानदार कामगिरी करत स्कॉटलंडचा १-० असा पराभव केला. या विजयासह मोरोक्कोने

FIFA World Cup 2026 Brazil vs Haiti : ब्राझीलचा हैतीवर 3-0 असा दणदणीत विजय; हैतीचं विश्वविजयाचं स्वप्न भंगलं

कार्लो अँचेलोटी यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या ब्राझीलने फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पहिला विजय नोंदवत

Harshit Rana : अफगाणिस्तानविरुद्धच्या अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी हर्षित राणाचे भारतीय संघात पुनरागमन

मुंबई : अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यासाठी वेगवान गोलंदाज हर्षित राणाचा भारतीय

Indian Womens Team : श्रेयंका पाटीलच्या जागी प्रेमा रावतला संधी ! WPL मध्ये फक्त सहा सामने आणि थेट वर्ल्ड कप मध्ये एन्ट्री !

मुंबई : टी-२० विश्वचषक(T20 world cup 2026 )स्पर्धेदरम्यान भारतीय महिला संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाची स्टार अष्टपैलू

S.Shreesanth : गौतम गंभीरवर श्रीशांतची जोरदार टीका; 'त्याचा काही उपयोग नाही, त्याच्या जागी धोनीला प्रशिक्षक बनवा !

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण झाला आहे. भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस.श्रीशांत (S.Shreesanth )

Ben Stokes Comeback : नाईट क्लब वादानंतर बेन स्टोक्सचे पुनरागमन; काउंटी क्रिकेट खेळणार !

इंग्लंड : इंग्लंड क्रिकेटचा स्टार ऑल राउंडर बेन स्टोक्स सध्या नाईट क्लब (Night Club Incident ) वादामुळे चर्चेत आहे. यात आता