DC vs LSG: दिल्लीच्या विजयाने राजस्थान क्वालीफाय, लखनौचा १९ धावांनी पराभव...

DC vs LSG:  दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांचा प्लेऑफसाठीचा संघर्ष कायम आहे. लखनौ आणि दिल्ली आज आमने-सामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल लखनौच्या बाजुने लागला. लखनौचा कर्णधार केएल राहुलने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण हा निर्णय दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याला हवा होता.


जेक फ्रेझर मॅकगुर्क आणि अभिषेक पोरेल ही जोडी दिल्लीकडुन सलामीसाठी मैदानात उतरली होती. पण पहिल्या षटकातच दिल्लीला धक्का बसला. जेक फ्रेझरला दुसऱ्या चेंडुवरच कोणत्याही धावा न बनवता बाद झाला. पण अभिषेक पोरेल आणि शाई होप आक्रमक खेळी केली. या जोडगोळीने ९२ धावांची भागीदारी केली. अभिषेक पोरेलने ३३ चेंडूत ४ षटकार आणि ५ चौकाराच्या मदतीने ५८ धावा केल्या. शाई होप २३ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. ऋषभ पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र २३ चेंडूत ३३ धावा करुन तो बाद झाला. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि अक्षर पटेल यांनी शेवटच्या षटकात जोरदार फटकेबाजी केली. स्टब्सने २२ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ४ गडी गमवून २०८ धावा केल्या आणि विजयासाठी २०९ धावांचं आव्हान दिलं.


दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौ सलामीवीर विशेष खेळी करण्यात अयशस्वी ठरले. डि कॉक १२ धावांवर तर केएल राहुल ५ धावा बनवुन बाद झाला. त्यानंतर आलेले फलंदाज देखील खास काही करु शकले नाहीत. स्टॉयनिस ५ धावा बनवुन परतला. तर दिपक हुडाला खातं देखील उघडता आलं नाही. मात्र त्यानंतर आलेल्या निकोलस पुरनने संघासाठी आक्रमक खेळी केली. २७ चेंडुत ६१ धावा बनवुन त्याने संघाला सामन्यात परत आणले.


पुरन बाद झाल्यानंतर सामना दिल्लीच्या पक्षात आला असं वाटत असताना, अरशद खानने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेत आक्रमक खेळी केली. सातव्या नंबरवर आलेल्या अरशदने अर्धशतक ठोकत संघाला आव्हानाच्या अगदी जवळ आणले. पण अरशदची खेळी संघाला विजयी बनवु शकली नाही. दिल्लीसाठी ईशांत शर्माने सर्वाधिक म्हणजेच ३ गडी बाद केले. लखनौ २० षटकात १८९ धावा बनवु शकला. दिल्लीचा तब्बल १९ धावांनी विजय झाला.


लखनौने हा सामना गमावल्याने प्लेऑफचं गणित खूपच किचकट झालं आहे. काहीही न करता राजस्थान प्लेऑफमध्ये पोहचले. तर लखनौ सुपर जायंट्सचा कमी नेट रनरेटमुळे आरसीबी, चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीलाही त्याचा नकळत फायदा झाला आहे.

Comments
Add Comment

IND vs AUS: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने जिंकला टॉस, भारताला फलंदाजीस बोलावले

अ‍ॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने टॉस

Video: शुभमन गिलसोबत पाकिस्तानी चाहत्याने केले नापाक कृत्य, आधी हात मिळवला आणि...

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान अ‍ॅडलेडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा

महिला विश्वचषक : सेमीफायनलच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला विजय आवश्यक

नवी मुंबई : २०२५ महिला विश्वचषक एका रोमांचक टप्प्यावर पोहोचला आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीत फक्त एकच स्थान

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर कमबॅकचे आव्हान

कॅनबेरा : ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाचा दुसरा मुकाबला ऍडलेड ओव्हल येथे रंगणार आहे. पहिला एकदिवसीय सामना

एकदिवसीय महिला विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी तीन संघाची लागणार ताकद, भारतासमोर न्यूझीलंडचे आव्हान

मुंबई: क्रिकेट विश्वातील एकदिवसीय महिला विश्वचषकच्या यावर्षीच्या स्पर्धेत आतापर्यंत २२ सामने पार पडले आहेत. हा

ऑलिंपिक विजेता नीरज चोप्राला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी

नवी दिल्ली : ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याला बुधवारी भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल या मानद