मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात (Loksabha Election 2024) आज मतदान पार पडले. यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) ९६ जागांवर मतदान झाले. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८ आणि महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.
संध्याकाळी ५ वाजेपर्यंत देशात ५२.६०% मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. या ठिकाणी ७५.६६% मतदान झाले आहे.
आंध्र प्रदेश – ६८.०४%
बिहार – ५४.१४%
जम्मू-काश्मीर – ३५.७५%
झारखंड – ६३.१४%
मध्य प्रदेश – ६८.०१%
महाराष्ट्र – ५२.४९%
ओडिशा – ६२.९६%
तेलंगणा – ६१.१६%
उत्तर प्रदेश – ५६.३५%
पश्चिम बंगाल – ७५.६६%
राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी सुमारे ५२.४९ टक्के मतदान झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी :
नंदुरबार – ६०.६०%
जळगाव – ५१.९८%
रावेर – ५५.३६%
जालना – ५८.८५%
औरंगाबाद – ५४.०२%
मावळ – ४६.०३%
पुणे – ४४.९०%
शिरूर – ४३.८९%
अहमदनगर- ५३.२७%
शिर्डी – ५२.२७%
बीड – ५८.२१%
नवी दिल्ली : अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईचा वीजवापर ‘४००० मेगावॅट’ पार! तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी मुंबई : राज्यातील उष्णतेच्या…
शांघाय : बाजारात सोन्याच्या किमती ऐतिहासिक उच्चांक गाठत असतानाच, चीनमधील शांघाय शहरात एक भन्नाट तंत्रज्ञान…
तुर्कस्तान : तुर्कस्तानमध्ये (तुर्कीये किंवा टर्की) भूकंपामुळे जमीन हादरली. जर्मन भूगर्भतज्ज्ञांनी तुर्कस्तानमध्ये ६.२ रिश्टर क्षमतेचा…
चीयरलीडर्स आणि फटाक्याच्या आतषबाजीविना रंगणार सामना, काळी फित बांधून उतरणार खेळाडू हैदराबाद: पहलगाम येथे पर्यटकांवर…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत (Marathi Movie) सातत्याने नवनवीन चित्रपटांची घोषणा होत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक…