
मुंबई: राजस्थान रॉयल्सचा(rajasthan सलामीचा फलंदाज जोस बटलरने संघाला मोठा झटका दिला आहे. आता बातमी येत आहे की आयपीएल २०२४मध्ये बटलर राजस्थानसाठी बाकी सामने खेळणार नाही. लवकरच तो पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील ४ टी-२० सामन्यांची मालिका सुरू होत आहे. यात खेळण्यासाठी बटलरने आयपीएल २०२४मधून आपले नाव परत घेतले आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात २२मे ते ३० मेपर्यंत ४ टी-२० सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर टी-२० वर्ल्डकप सुरू होईल. यात बटलर इंग्लंडचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
राजस्थान रॉयल्सने शेअर केला व्हिडिओ
राजस्थान रॉयल्स फ्रंचायजीने आपल्या अधिकृत अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. यात जोस बटलर हॉटेलच्या बाहेर जाताना दिसत आहे. त्याने आपल्या सहकाऱ्यांची गळाभेट घेतली आणि गाडीत बसल्यानंतर राजस्थान रॉयल्सने ट्रॉफी जिंकावी अशी प्रार्थना केली.
We’ll miss you, Jos bhai! 🥺💗 pic.twitter.com/gnnbFgA0o8
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 13, 2024
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अली, जॉनी बेअरस्ट्रॉ, सॅम करन, विल जॅक्स, फिल साल्ट आणि रीस टोप्ली यांचा समावेश आहे. यासाठी हे सर्व खेळाडू या वीकेंडपर्यंत इंग्लंडला परतू शकतात. बेअरस्ट्रॉ आणि सॅम करनही पंजाब किंग्ससाठी खेळत आहे. मात्र त्यांचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. दुसरीकडे विल जॅक्स आणि रीस टोप्ली आरसीबीच्या प्लेऑफच्या आशांना झटका देऊ शकतात. फिल साल्ट आणि मोईन अली गेल्या सामन्यांत अनुक्रमे केकेआर आणि सीएसकेसाठी चांगली कामगिरी करत आहेत.
प्लेऑफमध्येही नाही पोहोचला राजस्थानचा संघ
जोस बटलर इंग्लंडवरून परतण्याआधी राजस्थान रॉयल्ससाठी चांगला खेळ करत होता. बटलरने या हंगामात ११ सामन्यांत ३५९ धावा ठोकल्या होत्या आणि त्याने या हंगामात २ शतके ठोकली होती. पॉईंट्स टेबलबाबत बोलायचे झाल्यास राजस्थान सध्या १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थानचे आणखी २ सामने बाकी आहेत आणि आणखी एक विजय त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित करू शकतो.