IPL 2024 : इंग्लंडच्या खेळाडूंचा 'हा' प्रकार पाहून सुनील गावस्करांचा चढला पारा!

  74

काय आहे प्रकरण?


मुंबई : सध्या क्रिकेटविश्वात आयपीएलची (IPL) हवा आहे. कोणता संघ बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, या दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या (England Cricket Board) एका आदेशामुळे भडकले आहेत. या क्रिकेट बोर्डावर दंडात्मक कारवाई करण्याचा सल्लाही त्यांनी बीसीसीआयला (BCCI) दिला आहे. याचं कारण म्हणजे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी २० वर्ल्डकप खेळणाऱ्या आपल्या खेळाडूंना आयपीएल सोडून लवकर मायदेशी परतण्यास सांगितले आहे. त्यामुळे गावसकर यांनी आयपीएलचा हंगाम लवकर सोडणाऱ्या खेळाडूंवर कारवाई करण्याची मागणी बीसीसीआयकडे केली आहे.


काही आठवड्यापूर्वी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने जे खेळाडू टी २० वर्ल्डकप संघात निवडले गेले आहेत त्यांना २२ मे पूर्वी मायदेशात दाखल होण्यास सांगितले होते. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात टी २० मालिका होणार आहे. त्यासाठी या सर्व खेळाडूंना मायदेशात परत बोलवण्यात आलं आहे. मात्र, यामुळे आयपीएलचे नुकसान होणार आहे. यावर सुनील गावस्कर यांनी आपले परखड मत व्यक्त केले.


सुनिल गावसकर म्हणाले की, 'मी देशाकडून खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचे समर्थन करतो. मात्र खेळाडूंनी फ्रेंचायजींना संपूर्ण हगामासाठी त्यांच्या उपलब्धतेबाबत आश्वस्त केले आणि आता ते माघार घेत आहेत, यामुळे फ्रेंचायजीचं नुकसान होत आहे. फ्रेंचायजी हे त्यांना एका हंगामासाठी एवढे पैसे देतात की तेवढे पैसे ते देशाकडून काही हंगाम खेळले तरी मिळवू शकत नाहीत.'


ते पुढे म्हणाले की, 'फ्रेंचायजीने अशा खेळाडूंच्या फीमधून मोठी रक्कम कापून घ्यावी. याचबरोबर क्रिकेट बोर्डांना त्यांचे १० टक्के कमिशन देखील देण्यात येऊ नये. जर बोर्ड आश्वस्त करून माघार घेत असतील तर त्यांना देखील दंडीत केलं पाहिजे. खरं सांगायचं तर क्रिकेट बोर्डांना प्रत्येक खेळाडूमागे १० टक्के कमिशन हे फक्त आयपीएलमध्येच दिले जाते. जगात इतर कोठेही असं केलं जात नाही. बीसीसीआयच्या या उदारपणाचे कोणी आभार मानतं का? नाही नक्कीच नाही', अशा प्रकारे गावस्कर यांनी संताप व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या