Friday, May 9, 2025

देशमहत्वाची बातमी

PM Modi: पाटणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास

PM Modi: पाटणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रचला इतिहास

पाटणा: बिहारची राजधानी पाटणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो झाला. आधी पंतप्रधान मोदी रविवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पाटणा एअरपोर्टवर पोहोचले आणि तेथून पाटणाच्या भट्टाचार्य रोडवर पोहोचले. पंतप्रधान मोदींच्या रोडशोची सुरूवात पाटणाच्या भट्टाचार्य रोड पासून सुरू झाली, साधारण २.५ किमीचा हा रोड शो पाहण्यासाटी पाटणाच्या रस्त्यांवर लोकांची तोबा गर्दी जमा झाली. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रथ थांबवून मध्ये मध्ये लोकांना अभिवादन केले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोडशो दरम्यान त्यांच्यासोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हाही होते. पाटणाचे लोक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी विविध भागातून आले होते. पंतप्रधान मोदींच्या रोड शो दरम्यान पाटणाच्या रस्त्यांवर अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी झांकी, पुष्पवर्षा, आरती, होर्डिंगची व्यवस्था करण्यात आली होती. तर पाटणामधील लोक मोदींची एक झलक पाहण्यासाठी घरांच्या छतावर उभे राहिले होते.



पंतप्रधानांनी पाटणामध्ये रचला इतिहास


पंतप्रधान मोदींच्या रोडशोसाठी खास तयार करण्यात आलेल्या रथामध्ये त्यांच्यासोबत बिहारचे नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि विजय सिन्हाही होते. तर रथामध्ये पंतप्रधान मोदींसह पाटणाचे साहिब उमेदवार रवीशंकर प्रसादही होते. या दरम्यान रस्त्याच्या बाजूला लोकांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतामध्ये आपल्या मोबाईलची टॉर्च लाईटही पेटवली.


रस्त्यावर लोक पंतप्रधान मोदींची एक झलक पाहण्यासाठी खूप उत्साही होते. पंतप्रधान मोदी पहिल्यांदा पाटणामध्ये रोड शोमध्ये इतिहास रचला आहे. याआधी कधीही पंतप्रधानांनी पाटणामध्ये रोड शो केला होता.

Comments
Add Comment