मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना एक मुलाखत दिली. ही मुलाखत आज ठाकरे गटाचंच मुखपत्र असलेल्या ‘सामना’ (Saamana) वर्तमानपत्रात छापून आली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी ‘भाजपमुक्त राम पाहिजे’ अशी टीका केली. यावर भाजपा प्रवक्ते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार टीका केली आहे. यासोबतच त्यांनी पाकिस्तानचे समर्थन करणार्या इंडिया आघाडी (INDIA Alliance) आणि मविआवर (Mahavikas Aghadi) घणाघात केला आहे. ‘इंडिया आघाडीला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत, त्यामुळे विचार करुन मत द्या’, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.
नितेश राणे म्हणाले, इंडिया अलायन्सच्या नावाने आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नावाने मुस्लीम लीगची भाषा करणारे, मुस्लीम लीगची हिरवी पिल्लावळ म्हणून महाराष्ट्रात वळवळ करणारे हे लोक आहेत. उद्या जर आपण इंडिया अलायन्सला आपण मत दिलं तर आपल्याला भारताच्या नाक्यानाक्यावर पाकिस्तानचे झेंडे दिसतील. जिथे आपण आज रामभक्त म्हणून दुकानाबाहेर किंवा घराबाहेर भगवे झेंडे फडकवतोय, त्याचीही परवानगी आपल्याला भारतामध्ये राहून मिळणार नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर काय झालंय ते पाहा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
पुढे ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात कोरोनाच्या नावाने जसं सगळ्या सणासुदींवर बंदी घातली होती आणि दुसर्या बाजूला मोहरम आणि ईदच्या जोरदार मिरवणुका निघत होत्या तीच परिस्थिती उद्या इंडिया अलायन्स आणि मविआची लोकं निवडून आल्यानंतर भारतात होणार. तुम्ही सार्वजनिक हिंदूंचे उत्सव सोडा, तुमच्या घरातील मंदिराची पूजा करण्याची परवानगी तरी तुम्हाला देतील का इथपासून प्रश्न निर्माण होतील.
इंडिया अलायन्सच्या नावाने जे काही मतदान होतंय, जे काही फतवे निघतायत, ते धर्माच्या आधारे निघतायत, राष्ट्रभक्तांसाठी निघत नाही आहेत. संजय राजाराम राऊत हा कार्टा जे सकाळी बोलत होता की राष्ट्रभक्तांसाठी फतवे निघत आहेत, त्या कार्ट्याला हे पण कळत नाही की धर्माच्या आधारे मुसलमान लोकांनी फक्त इंडिया आघाडी आणि मविआला मतदान करावं कारण ‘हमारा धर्म खतरे में है’, याला राष्ट्रभक्ती म्हणत नाहीत. म्हणून इंडिया आघाडी आणि मविआला मत म्हणजे लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि वक्फ बोर्डच्या समर्थकांना मत, असं नितेश राणे म्हणाले.
ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणाले की राम मंदिर आम्हाला भाजपमुक्त करायचं आहे त्याप्रमाणे आम्हालाही हिंदू समाज उद्धव ठाकरेमुक्त करायचा आहे. कारण उद्धव ठाकरेची हिरवी टोळी जो हिंदू समाजाचा द्वेष करत आहे, त्या सगळ्याला नष्ट करण्याचं काम या देशाची जनता निश्चित पद्धतीने करेल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…