Jioचा सगळ्यात स्वस्त पोस्टपेड प्लान, मिळणार ५जी डेटा

मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला अनेक प्लान्सचे पर्याय मिळतात. कंपनी प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही प्रकारचे प्लान्स ऑफर करत असते.

सगळ्यात स्वस्त प्लान


जर तुम्हाला जिओचा स्वस्त पोस्टपेड प्लान हवा असेल तर जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक पर्याय मिळतील. कंपनी २९९ रूपयांचा सर्वात स्वस्त प्लान ऑफर करते.

किती मिळणार डेटा


यात तुम्हाला अनलिमिटेड ५जी डेटा, व्हॉईस कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही मिळते. हा प्लान ३० जीबी डेटासोबत येतो. रिचार्जच्या पूर्ण सायकलमध्ये तुम्हाला एकूण ३० जीबी डेटा मिळेल. डेटा लिमिट संपताच युजर्सला १० रूपये प्रति जीबी दराने डेटा मिळेल.

या रिचार्जमध्ये फॅमिली अॅड ऑनची सुविधा मिळत नाही. याशिवाय ग्राहकांना दररोज १०० एसएमएसही या प्लानसोबत भेटतील. रिचार्ज प्लान अनलिमिटेड ५जी डेटासह येतो. दरम्यान, यासाठी तुमच्याकडे ५जी फोन असणे गरजेचे आहे आणि तुमच्या भागामध्ये ५ जी नेटवर्क असणेही गरजेचे आहे.

जिओच्या २९९ रूपयांच्या प्लानमध्ये अतिरिक्त फायदेही मिळतात. कंपनी जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेस देत आहे. लक्षात ठेवा की या प्लानसोबत तुम्हाला जिओ सिनेमाचा प्रीमियम अॅक्सेस मिळणार नाही. यासाठी तुम्हाला महिन्याला कमीत कमी २९ रूपये खर्च करावे लागतील.

जिओ सिनेमाचे तीन सबस्क्रिप्शन येतात. कंपनी २९ रूपये, ८९ रूपये आणि ९९९ रूपयांचे प्लान ऑफर करते. ९९९ रूपयांच्या या प्लानची व्हॅलिडिटी १ वर्ष असते.
Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी