Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीGovernment Job : मेगाभरती! युवकांना भरघोस पगाराच्या सरकारी नोकरीची संधी

Government Job : मेगाभरती! युवकांना भरघोस पगाराच्या सरकारी नोकरीची संधी

लेखी परीक्षाही द्यावी लागणार नाही; जाणून घ्या कोणत्या पदांसाठी होत आहे भरती?

मुंबई : सध्या अनेकजण सरकारी तसेच उत्तम पगार मिळणाऱ्या नोकरीच्या शोधात असतात. सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याचा अनेकांचा विचार असतो, मात्र भरतीपूर्वी होणाऱ्या लेखी परीक्षांच्या भीतीमुळे अनेक तरुण सरकारी नोकरीचे अर्ज भरत नाहीत. अशाच लेखी परीक्षांना घाबरणाऱ्या युवकांसाठी ही महत्त्वाची माहिती मिळाली आहे.

डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. विशेषत: यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. डीआरडीओ या संस्थेच्या अधिकृत वेबसाइटवर ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट या पदांसाठी भरती जाहीर केली आहे. जाणून घ्या या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि अर्जाची शेवटची तारीख याबाबतची सविस्तर माहिती.

ज्युनिअर रिसर्च फेलो

ज्युनिअर रिसर्च फेलो पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक/एमई/एमटेक/एमएससी मध्ये पदवी पूर्ण केलेली असावी. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३७ हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

रिसर्च असिस्टंट

रिसर्च असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पीएचडी पदवी पूर्ण केलेली असावी. किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग किंवा एमई/एमटेक पदवी आणि संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असावा. रिसर्च असोसिएट पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ६७ हजार रुपये इतका पगार दिला जाईल.

२८ वर्षे वय असलेले उमेदवार ज्युनिअर रिसर्च फेलो आणि रिसर्च असिस्टंट पदासाठी अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवाराची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

‘असा’ करा अर्ज

DRDO ची अधिकृत वेबसाइट https://drdo.gov.in/ वर जा. करिअर टॅबवर क्लिक करा. नंतर ज्युनिअर रिसर्च फेलो किंवा रिसर्च असिस्टंट यापैकी तुम्हाला ज्या पोस्टसाठी अर्ज करायचा आहे ते निवडा. यापुढे तुम्हाला ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिक करा. हे करताना तुम्हाला सर्वात आधी स्वत:ची नोंदणी करावी लागेल. यासाठी येथे न्यू युजर म्हणून पर्याय दिसेल.

कशी कराल नोंदणी?

नोंदणी करताना तुमचे नाव, ईमेल पत्ता, मोबाईल नंबर, पासवर्ड आणि इतर माहिती भरावी लागेल. नोंदणी केल्यावर तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. हा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा. तुमची शैक्षणिक पात्रता आणि इतर माहितीसह अर्ज पूर्ण भरा. तसेच तुमच्याकडे मागण्यात आलेली कागदपत्रे आवश्यक अपलोड करा. नंतर अर्ज शुल्क भरुन फॉर्म सबमिट करा. त्यनंतर या फॉर्मची प्रिंट आऊट काढून ती तुम्हाला ऑफलाइन माध्यमातून पाठवावी लागतील.

कुठे पाठवाल अर्ज?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज द ज्युनिअर रिसर्च फेलोशिप अरमामेंट रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट आर्मामेंट पोस्ट. पुणे- ४११०२१ येथे पाठवावा लागेल. DRDO ची अधिकृ वेबसाइट drdo.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -