नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीमुळे मंत्री छगन भुजबळ आणि भुजबळ समर्थक हे नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मतदानाला अवघे आठ दिवस बाकी असताना मंत्री भुजबळ हे गोडसेंच्या प्रचारासाठी उतरत नसल्यामुळे मंत्री भुजबळ हे नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्या.
मात्र आज महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ नाशिकच्या सातपूर येथे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तळपत्या उन्हात मंत्री भुजबळांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे मंत्री भुजबळ नाराज आहेत, अशा चर्चा होत्या भुजबळाने देखील गोडसेंच्या प्रचारात थेट सहभाग घेतला नव्हता.
मात्र आता आज मंत्री भुजबळ हे हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी नाशिकमधील सातपूर परिसरातील बाईक रॅलीमध्ये सहभागी झाले. यावेळी भुजबळांच्या सहभागामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चाना पूर्णविराम मिळाल्याचं बोललं जात आहे.