बेईजिंग : चीनच्या एका प्राणिसंग्रहालातून (China zoo) अजबगजब बाब समोर आली आहे. येथे पांडा (Panda) नसल्यामुळे चक्क कुत्र्यांना काळा-पांढरा रंग देत त्यांना पांडाप्रमाणे बनवण्यात आले. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे. हे डॉग्ज फारच क्युट दिसत आहेत. मात्र, प्रशासनाने आलेल्या पर्यटकांची ‘अशी ही बनवाबनवी’ केल्याने पर्यटक नाराज झाले आहेत.
जिआंग्सू प्रांतातील ताईझौ प्राणीसंग्रहालयाने (Taizhou Zoo) गेल्या आठवड्यात पांडा हे नवीन आकर्षण झूमध्ये असल्याचे सांगितले. मात्र, खरं तर ते प्राणीसंग्रहालयातील प्रशासनाने रंगवलेले कुत्रे होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या झूमध्ये चाऊ-चाऊ जातीच्या श्वानांना (Chow chow dogs) पांडा म्हणून सादर केलं जात होतं. त्यांनी श्वानांचे केस अशा प्रकारे कापले की ते लांबून पांडाप्रमाणे गोलू-मोलू दिसतील. त्यानंतर त्यांनी या श्वानांना पांडा प्रमाणेच ब्लॅक अँड व्हाईट रंग दिला. मात्र तरीही त्यांची हालचाल आणि भुंकणं यामुळे ते पांडा नसल्याचं लगेच दिसून येत आहे.
१ मे रोजी अनावरण झालेल्या या प्रदर्शनात दररोज सकाळी ८ ते संध्याकाळी ५ या दरम्यान पेंट केलेले कुत्रे प्रदर्शनात ठेवण्यात येत होते. मात्र प्राणीसंग्रहालयाच्या फसवणुकीची बातमी पसरू लागेपर्यंत त्यांना पाहण्यासाठी अनेक पर्यटकांची गर्दी जमली होती. यानंतर फसवणुकीचा प्रकार पर्यटकांच्या लक्षात आला व त्यानुसार तक्रार दाखल करण्यात आली. प्राणीसंग्रहालयावर आपल्या ग्राहकांची फसवणूक आणि प्राण्यांवर क्रूरतेचा आरोप करण्यात आला आहे.
या श्वानांना प्राणीसंग्रहालय प्रशासन ‘पांडा डॉग्स’ असं म्हणत आहे. हे डॉग्स नक्कीच क्यूट आणि मनोरंजक आहेत. मात्र, यामुळे झू पहायला आलेल्या प्रेक्षकांची फसवणूक झाल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसंच श्वानांवर देखील अत्याचार होत असल्याचं नेटिझन्सचं म्हणणं आहे.
प्राणीसंग्रहालय प्रशासनाने मात्र आपल्या या निर्णयाची पाठराखण केली आहे. “आमच्याकडे पांडा नाहीत म्हणून आम्ही ही शक्कल लढवली आहे. श्वानांना रंग देण्याबद्दल देखील काही अडचण नसावी. आपण स्वतः देखील हेअर डाय करतोच. नैसर्गिक रंग वापरून श्वानांना देखील रंग दिला जाऊ शकतो..” असं प्राणीसंग्रहालायाच्या एका प्रवक्त्याने म्हटलं आहे. प्राणीसंग्रहालयाने असेही सांगितले की त्यांना वास्तविक पांडे मिळू शकत नाहीत, कारण ते ठेवण्यासाठी क्षेत्र खूपच लहान आहे.
चीनमधील प्राणीसंग्रहालयावर अशा प्रकारची फसवणूक केल्याचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑगस्ट २०२३ मध्ये, पूर्व चीनमधील हांगझोऊ प्राणीसंग्रहालयावर खरा करार नसल्यामुळे अस्वलाच्या वेषात अस्वलाच्या पोशाखात एक माणूस आल्याचा आरोपही करण्यात आला होता.
मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…