Sanjay Raut : संजय राऊत यांनी पंतप्रधानांबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपकडून तक्रार दाखल!

ऐन निवडणुकीच्या वेळी राऊतांच्या अडचणी वाढणार


नाशिक : ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कायम बेताल वक्तव्ये करीत असतात. त्यांच्या वक्तव्यांमुळे त्यांना नेहमीच भाजपच्या नेत्यांचा रोष सहन करावा लागला आहे. त्यातच त्यांनी अहमदनगर येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना महाराष्ट्राच्या मातीत दफन करण्याची दिली. याबाबत भाजपचे नेते संतापले आहेत. "संजय राऊत यांनी दिलेली धमकी ही प्रक्षोभक, बेजबाबदार, सामाजिक तेढ निर्माण करणारी आहे", अशी तक्रार भाजपने केली आहे.


संजय राऊत यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश भाजपने निवडणूक आयोगासह मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार केली आहे. तसेच अंबड पोलिस ठाण्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी तक्रार अर्ज दिला आहे. भाजप नेत्यांकडून अमरावती, मुंबई, बीडसह राज्यात विविध ठिकाणी संजय राऊत यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.


“पंतप्रधान मोदी आणि औरंगजेब यांच्यात त्यांच्या जन्मस्थानांवर आधारित ऐतिहासिक समांतरे काढण्याचा श्री. राऊत यांचा प्रयत्न दिशाभूल करणारा आणि फूट पाडणारा आहे. अशा वक्तव्यांमुळे जातीय तणाव निर्माण होण्याची आणि निवडणुकांच्या शांततेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे”, असा दावा भाजपने पत्रात केला आहे.


“संजय राऊत यांचे पंतप्रधान यांच्या विरोधातील विधान मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या तत्त्वांच्या विरोधात आहे हे उघड आहे आणि या प्रकरणावर त्वरित कारवाई करणे अत्यावश्यक आहे. संजय राऊत यांच्या या वक्त्याव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उच्च मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवितास धोका आहे हे स्पष्ट होते”, असा दावाही पत्रात करण्यात आला आहे.


“अशा भडकाऊ विधानामुळे अशांतता, सामाजिक आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते. मी निवडणूक आयोगाला आणि संबंधित अधिकारी यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याची आणि भविष्यात अशा भडकाऊ भाषणाची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याची विनंती करतो. या प्रकरणाकडे लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद”, असं भाजपने पत्रात म्हटलं आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते ओमप्रकाश चौहान यांनी हे पत्र पाठवलं आहे.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास