Border 2 Movie : तब्बल २७ वर्षांनंतर पुन्हा एकदा दिसणार 'बॉर्डर'वरील संघर्ष!

सनी देओलसह 'हा' अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत


मुंबई : 'बॉर्डर' (Border movie) या १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय जवानांच्या संघर्षावर आधारलेल्या चित्रपटाने भारतीय सिनेसृष्टीत धुमाकूळ घातला होता. मल्टी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाने प्रेक्षकांना भावूक करत त्यांची मने जिंकली होती. यातील 'संदेसे आते है' (Sandese aate hain) या गाण्याने आजही भारतीयांच्या डोळ्यांत अश्रू तरळतात. या सिनेमाच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या सिनेमाच्या दुसर्‍या भागाची (Border 2) घोषणा करण्यात आली असून पुढील वर्षात २३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


'बॉर्डर २' या चित्रपटाचे निर्माते म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलाच्या शौर्याचा गौरव करणारा हा चित्रपट असणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी प्रजासत्ताक दिनापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. त्यानुसार २६ जानेवारीपूर्वी २३ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित करायचं ठरवलं आहे.


सनी देओलसोबत (Sunny Deol) आयुष्मान खुराना (Ayushman Khurana) देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खास भूमिका साकारणार आहे. बॉर्डर २ चे दिग्दर्शन अनुराग सिंग (Anurag Singh) करणार आहेत. त्यांनी अक्षय कुमारच्या 'केसरी' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.



आजवरचा सर्वात मोठा युद्धपट


या चित्रपटाच्या कथेवर जवळपास वर्षभरापासून काम सुरू आहे, असं म्हटलं जात आहे. ‘बॉर्डर पार्ट १’ सारखा हाही ब्लॉकबस्टर चित्रपट व्हावा, या दृष्टीकोनातून चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली जात आहे. मागच्या महिन्यात या चित्रपटाच्या कथेसंदर्भात माहिती समोर आली होती. यावेळी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान झालेल्या युद्धाची कथा दाखवण्यात येणार आहे. राजस्थानमधील थारच्या लोंगेवाला भारतीय चौकीवर ही लढाई झाली होती. हा आजवरचा सर्वात मोठा युद्धपट ठरणार असल्याचंही म्हटलं जात आहे. या चित्रपटाची कथा पहिल्या भागापेक्षा पूर्णपणे वेगळी असणार आहे.

Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Narendra Modi : आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, २१ व्या शतकासाठी आधुनिक क्रीडा परिसंस्था उभारण्यास

Kanpur Plane Crash : धक्कादायक! कानपूरमध्ये प्रशिक्षण विमान शेतात कोसळले; अनुभवी पायलटसह सह-पायलटचा अंत

कानपूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) येथे एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. गुरुवारी गंगा नदीच्या

Rule Change From 1st September : LPG गॅस सिलेंडर, आयटीआर अन् थेट तुमच्या...; १ सप्टेंबरपासून बदलणार ५ मोठे नियम!

ऑगस्ट महिना (August Month) अखेरच्या टप्प्यात आला असून १ सप्टेंबरपासून देशात अनेक महत्त्वाच्या आर्थिक आणि प्रशासकीय

Nepal Floods Impact on Bihar and UP : नेपाळच्या पुराचा बिहार-उत्तर प्रदेशालाही धोका; ७ जिल्ह्यांना अलर्ट, पुढील ४८ तास महत्त्वाचे

पाटणा : नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुराचा परिणाम आता भारतातील सीमावर्ती राज्यांवरही होण्याची शक्यता आहे.

Dating App Gang : 'नको तेच केलं!' डेटिंग ॲपवरून तरुणाला जाळ्यात ओढले अन्...; जयपूरमध्ये ‘गे डेटिंग ॲप गँग’चा पर्दाफाश

जयपूर : गे डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून तरुणांशी मैत्री करून त्यांना भेटण्यासाठी बोलावायचे आणि त्यानंतर हल्ला