Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाIPL 2024Team india: टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

Team india: टी-२० वर्ल्डकपआधी टीम इंडियासाठी गुड न्यूज

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचे काही खेळाडू टी-२० वर्ल्डकपची घोषणा झाल्यानंतर फ्लॉप झालेले दिसत होते. मात्र आता संघासाठी गुड न्यूज समोर आली आहे. संघातीने अनेक खेळाडूंनी फॉर्म मिळवला आहे. या यादीत आता मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवचे नावही सामील झाले आहे. सूर्याने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध खेळवण्यात आलेल्या आयपीएल २०२४च्या ५५व्या सामन्यात शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सूर्यकुमारने आव्हानाचा पाठलाग करताना ५१ बॉलमध्ये १२ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद १०२ धावा केल्या. हा मुंबईचा या हंगामातील चौथा विजय आहे. या विजयाने सूर्या फॉर्ममध्ये परतण्यासोबतच टीम इंडियालाही फायदा होईल. आयपीएलनंतर लगेचच जूनपासून टी-२० वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. जाणून घेऊया या की सूर्याआधी कोण कोणत्या खेळाडूंनी शतक ठोकत टीम इंडियाला गुड न्यूज दिली आहे.

सूर्यकुमार यादवच्या आधी टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात निवडला गेलेला विराट कोहली, यशस्वी जायसवाल आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी शतक ठोकले आहे. या खेळाडूंचे शतक टीम इंडियाला टी-२० वर्ल्डकप जिंकण्याच्या जवळ घेऊन जात आहे.

सूर्याने मुंबईला मिळवून दिला एकतर्फी विजय

मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने २० षटकांत ८ बाद १७३ धावा केल्या होत्या. संघासाठी ट्रेविस हेडने सर्वात मोठी खेळी करत ३० बॉलमध्ये ४८ धावा केल्या. यात ७ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. हेडशिवाय हैदराबादचे बाकी फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत.

त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करण्यासाछी उतरलेल्या मुंबई इंडियन्सने १७.२ षटकांत विजय आपल्या नावे केला. संघाला विजय मिळवून देण्यात सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. मुंबईने ४.१ षटकांत ३१ धावा देत ३ विकेट गमावल्या होत्या. येथून सूर्यकुमार यादवने शतकी खेळी करण्यास सुरूवात केली. त्याला तिलक वर्मानेही चांगली साथ दिली. तिलक आणि सूर्याने चौथ्या विकेटसाठी नाबाद १४३ धावांची भागीदारी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -