MI vs SRH: 'सुर्या' च्या प्रकाशाने मुंबई झळकली, ७ गडी राखुन हैदराबादवर विजय...

  38

MI vs SRH: मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबादकडून सलामीवीर ट्रेव्हिस हेड याने सर्वाधिक धावा केल्या. हेडने ३० बॉलमध्ये ७ चौकार आणि १ षटाकारच्या मदतीने ४८ धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा विशेष काही करु शकला नाही,  ११ धावांवर तो बाद झाला. मयंक अग्रवाल ५ धावा करुन बाद झाला. नितीश रेड्डी २० धावांवर माघारी परतला. पीयूष चावला याने हेन्रिक क्लासेन याला २ धावावर बाहेरचा रस्ता दाखवला. मार्को जान्सेन १७ रन्स करुन बाहेर गेला.


मुंबईने हैदराबादला झटके देत बॅकफुटवर ढकललं होतं. मात्र अडचणीच्या काळात कर्णधार पॅट कमिन्स याने नाबाद ३५ धावांची खेळी केली. त्यामुळे हैदराबादला १५० धावांचा टप्पा पार पाडता आला. तर मुंबईकडून कॅप्टन हार्दिक पंड्या आणि पीयूष चावला या दोघांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले . हैदराबादने २० षटकात ८ गडी गमावून १७३ धावा केल्या.


हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा सामना करताना रोहित शर्मा ४ धावा करून बाद झाला. पॅट कमिन्सने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मार्को यान्सनने दुसरे षटक टाकले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर ९ धावा काढून इशान किशन बाद झाला. मयंक अग्रवालने त्याचा झेल घेतला. त्यानंतर आलेला नमन धीर देखील काही विशेष करु शकला नाही.


मुंबई बॅकफुटवर असताना सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी करत शतक झळकावले. ५१ चेंडूत १०२ धावा करत तो नाबाद राहिला. तिलक वर्माने देखील सुर्याला मोलाची साथ दिली. ३२ चेंडुत ३७ धावा करून तिलकदेखील नाबाद राहिला. या दोघांनी १४९ धावांची भागीदारी करत मुंबईच्या गोटात विजयश्री खेचुन आणला. मुंबईने हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला.

Comments
Add Comment

ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन