Nitesh Rane : भाजपाच्या जाहिरातीमुळे पाकिस्तानी काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या झोंबल्या!

Share

संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो

पाकिस्तानचे समर्थन करणार्‍या काँग्रेसला आमदार नितेश राणे यांचा दणका

मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाने (BJP) काल वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात दिली होती, ज्यात मतदारांना प्रश्न विचारला होता की तुम्ही निवडून दिलेल्या सरकारबद्दल जल्लोष तुम्हाला भारतात करायला आवडेल की पाकिस्तानात? यात कुठेही काँग्रेस किंवा इंडिया अलायन्सच्या कोणत्याही घटक पक्षाचा उल्लेख केलेला नव्हता. तरीही ‘चोर की दाढी में तिनका’ याप्रमाणे मुस्लिम लीगची बी टीम आणि पाकिस्तानी एजंट म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना हिरव्या मिरच्या ढुंगणाखाली झोंबल्या आणि लगेच साप वळवळायला लागले’, असा हल्लाबोल भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला. पाकिस्तानचे (Pakistan) समर्थन करणार्‍या काँग्रेसला (Congress) नितेश राणे यांनी जोरदार चपराक लगावली.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी काल आपले असली रंग बाहेर दाखवले. कसाब आणि करकरेंच्या मधील जो घटनाक्रम त्यांनी सांगितला त्यातून त्यांनी शहिदांचा तर अपमान केलाच पण पाकिस्तानवर असलेलं त्यांचं प्रेमही दाखवून दिलं. त्यामुळे काँग्रेसला मत देणं म्हणजे भारताचा झेंडा उतरवून पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यासारखं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर, कर्नाटकात काँग्रेसची सत्ता जेव्हा आली, तेव्हा विजय मिरवणुकीत पाकिस्तान झिंदाबादचे नारे, आणि पाकिस्तानचे झेंडे फडकताना दिसले, असा आरोप नितेश राणे यांनी केला.

काँग्रेसचे नेते हे पाकिस्तानी एजंट बनून आणि स्वतःला भारतीय म्हणवून घेत इथे पाकिस्तानचं काम करतायत. पाकिस्तानमध्ये असलेल्या त्यांच्या बापाला केवळ खूश करण्यासाठी ते देशभक्त असलेल्या भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा संघटनांवर, लोकांवर, कार्यकर्त्यांवर टिकाटिप्पणी करतायत, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

संजय राऊत हा महाराष्ट्राचा बिलावल भुट्टो

याच पार्श्वभूमीचा धागा धरुन आज सकाळी संजय राजाराम राऊतने (Sanjay Raut) ज्याचं मी वारंवार धर्मांतर झालंय असा उल्लेख करतो. त्यानेही अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि करकरेंच्या मध्ये भांडण कसं होतं, कसं काही संघांच्या लोकांनी येऊन याला सांगितलं, अशा प्रकारे हा भांडुपमध्ये बसून बिलावल भुट्टोची भाषा करतो. बिलावलने भारताबद्दल, मोदीजींबद्दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल जी काही भाषा वापरली तशीच्या तशी भाषा या महाराष्ट्राच्या बिलावल भुट्टोने आज सकाळी वापरली.

पाकिस्तानमध्ये बिर्याणी पार्टी होता कामा नये

काँग्रेस नेते आणि संजय राऊतवर देशद्रोहाचा खटला चालवला पाहिजे. निवडणुकीच्या माध्यमातून पाकिस्तानला मदत करणं, जेवढा द्वेष पाकिस्तान मोदीजींचा करतंय, तशीच भाषा वापरणं म्हणून या सगळ्या पाकिस्तानी एजंट्सवर देशद्रोहाचा खटला चालवावा आणि आपल्या भारतातील नागरिकांनी विचार करुन मत द्यावं. कारण उद्या पाकिस्तानमध्ये बिर्याणी पार्टी होता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

रोहित पवार हा बाहेरचा पवार

रोहित पवार हे कालच्या बारामतीच्या सभेत रडताना दिसले, यानंतर अजित पवारांनी त्यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली. यावर नितेश राणे म्हणाले, रोहित पवार यांना फिल्मफेअरमध्ये कॉमेडियनचा अॅवॉर्ड जाहीर झाला असता तर तो अतिशय स्तुत्य असता. जर तो नसेल मिळाला तर मी फिल्मफेअरवाल्यांशी बोलतो आणि पुरस्कार त्यांच्या घरी पाठवून देतो. कारण असं शेंबड्या मुलांसारखं रडणं हे पवारांच्या रक्तात नाही, म्हणजे हा नक्कीच बाहेरचा पवार आहे, यावर शिक्कामोर्तब केलं पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

Recent Posts

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

14 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

54 minutes ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

1 hour ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

1 hour ago

IPL 2025: शुभमन गिल लग्न करतोय? आयपीएलमध्ये प्रश्न विचारल्यावर गिल लाजला आणि म्हणाला…

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगत…

3 hours ago