बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतले असते

Share

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य

काँग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ

ठाणे : विजय वड्डेटीवारांनी २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ‘काँग्रेसका हाथ पाकिस्तान के साथ’ असा घणाघात केला.

मुख्यमंत्री म्हणाले की, विजय वड्डेटीवारांनी २६/११ हल्ल्यातील शहिद पोलीस आणि मृत्यूमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंज चीड आणि संताप आणणारे आहे. भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वड्डेटीवार वेडे झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली. आरएसएस ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना आहे, असे त्यांनी सांगितले. वकिल उज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकवले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कॉंग्रेसचे धोरण पाकिस्तान धार्जिणे आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याकडून होणे हे दुर्देवी आहे. मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसने असेच आरोप केले होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगायला हवी होती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगवला.

नकली हिंदुत्व, मी हिंदू आहे, मी मर्द आहे असे बोलून कोणी हिंदू होत नाही. आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर यांना चांगलेच धुतले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बदला घेतला जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेसचे सरकार होते. त्यामुळे ही अपेक्षा फोल ठरली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन भारत मजबूर नाही तर मजबूत देश आहे, असे दाखवून दिले. ‘घुस के मारेंगे’ हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटले आहेत. गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर कॉंग्रेसने आक्षेप घेण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जेव्हा काँग्रेस निवडणुकीत जिंकतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. जेव्हा भारत मॅच हरतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत असताना देखील काश्मिरबाबत बोटचेपी धोरण ठेवले. आपल्या जवानांची मुंडकी छाटून पाकिस्तानात नेत असताना काँग्रेस सरकार मूग गिळून गप्प बसले होते. आता नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला वठणीवर आणले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Recent Posts

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी रेल्वेची विशेष गाडी

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…

12 minutes ago

Mumbai Crime : नवरा नाईट शिफ्टवरुन घरी येताच पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून…

मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…

17 minutes ago

Pahalgam Terror Attack : चौघांची ओळख पटली; दोन पाकिस्तानी, दोन स्थानिक

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…

40 minutes ago

Abir Gulaal : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ‘या’ चित्रपटावर बंदीची मागणी

मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…

42 minutes ago

पहलगाममध्ये सात अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू, तीन अतिरेक्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…

1 hour ago