Amitabh Bachchan : ‘बिग बी’कडून कोस्टल रोड आणि शिंदे-फडणवीस सरकारचे कौतुक!

Share

देवेंद्र फडणवीस यांनी फिल्मी स्टाईल मानले अमिताभ यांचे आभार

मुंबई : बहुचर्चित असलेल्या मुंबई कोस्टल रोडच्या (Mumbai Coastal Road) पहिल्या दहा किमी अंतराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यामुळे मुंबईला पश्चिम उपनगराला जोडणे शक्य झाले आहे. अनेकजण या कोस्टल रोडवरुन प्रवास करतानाचे फोटो आणि व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यातच आता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी देखील नुकतेच कोस्टल रोडवरुन प्रवास करत त्यांचा अनुभव शेअर केला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सरकारचे देखील कौतुक केले आहे. त्यांच्या या ट्विटवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी देखिल अगदी फिल्मी स्टाईल रिप्लाय दिला आहे.

मुंबई ते कांदिवली असा या कोस्टल रोडचा प्रकल्प आहे. दक्षिण कोस्टल रोड हा १०.५८ किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च हा १२,७२१ कोटी रुपये आहे. नुकतेच लोकार्पण झालेल्या अटल सेतूवरही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यानंतर आता कोस्टल रोडच्या कामाचे देखील कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, ‘T 4999 – Oh ! Boy !! went to work .. after Sea Link on to Coastal Road and Tunnel underground .. JVPD, Juhu to Marine Drive , 30 mins .. !! वाह ! क्या बात है! साफ़ सुथरी नयी बढ़िया सड़क, कोई रुकावट नहीं.’

अमिताभ यांच्या ट्विटपेक्षा यावर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या उत्तराची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अगदी फिल्मीस्टाईलमध्ये म्हटले आहे की, “Parampara, Pratishtha, Anushasan, Ye iss sarkar ke teen stambh hai !” e wo aadarsh hain jinse hum Bharatiyon ka kal banaate hai”…, अमिताभ जी तुम्ही तुमच्या प्रवासाचा अनुभव शेअर केलात, त्याबद्दल खूप आभार. मुंबई आता अपग्रेड होतेय आणि आम्ही मुंबईकरांसाठी वेळ वाचवणा-या प्रवासाचा अनुभव निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत.

Recent Posts

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

24 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

55 minutes ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

2 hours ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

3 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

5 hours ago