Prasad Oak : अशा ट्रेंडला वेळीच ठेचलं पाहिजे... मराठी इंडस्ट्रीत हे होऊ देणार नाही!

प्रसाद ओकने नेमका कशावर व्यक्त केला संताप?


मुंबई : हल्ली सोशल मीडियावर (Social media) इन्फ्लुएंसर्सची (Influencers) संख्या फार वाढली आहे. अनेकजण काहीतरी कंटेंट वापरुन छोटे छोटे व्हिडीओज बनवतात आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरतात. मनोरंजनाचा (Entertainment) भाग म्हणून या गोष्टीकडे पाहणं ठीक आहे, पण याच इन्फ्लुएंसर्सच्या फॉलोवर्सची संख्या पाहून त्यांना मोठ्या मोठ्या ऑफर्स दिल्या जातात. त्यामुळे खरा कलावंत मागे पडत असल्याचे चित्र आहे.


सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सना अशा प्रकारे काम देण्यास अनेक कलाकारांनी विरोध केला आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेत प्रसिद्ध मराठी अभिनेता प्रसाद ओकनेही (Prasad Oak) संताप व्यक्त केला आहे. 'अशा ट्रेंडला वेळीच ठेचलं पाहिजे, मराठी इंडस्ट्रीत हे होऊ देणार नाही!' असं एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद म्हणाला.


केवळ फॉलोवर्सची संख्या पाहून प्रोमोशनच्या दृष्टीने इन्फ्लुएंसर्सना काम दिलं जातं. त्यामुळे सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स सध्याच्या काळात सेलिब्रिटी झाले आहेत. मात्र, कामाची गुणवत्ता ढासळत आहे. प्रसाद ओक यावर तीव्र नापसंती दर्शवत म्हणाला, हे अतिशय दुर्दैवी आहे. अत्यंत थर्ड क्लास क्राइटेरिया आहे हा की ज्यांचे फॉलोअर्स जास्त तो चांगला किंवा मोठा अ‍ॅक्टर आहे. हा हिंदीवाल्यांनी आणलेला ट्रेंड आहे; जो मराठीत रुजू पाहतोय. पण तो वेळीच ठेचला गेला पाहिजे आणि तो ठेचला जाईलच, असा विश्वास प्रसाद ओकने व्यक्त केला.



मराठी इंडस्ट्रीत हे होऊ देणार नाही


प्रसाद ओकने म्हटले की, मराठी सिनेसृष्टीत परेश मोकाशी, आदित्य सरपोतदार, प्रविण तरडे, रवी जाधव, विजू माने आणि मी स्वत: असे आम्ही अनेक सहकारी, दिग्दर्शक जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे आहोत. तोपर्यंत फॉलोअर्सच्या कॅटेगिरीचा मराठी सिनेसृष्टीत कोणताही परिणाम होणार नाही किंवा मोठा फरक पडेल असे मला वाटत नसल्याचेही प्रसाद ओकने म्हटले. हिंदीत हा प्रकार सुरू आहे. पण एकदा त्यांना तो कलाकार कसा आहे हे कळल्यावर त्याला ते अनफॉलो करतील असेही त्याने म्हटले.


दरम्यान, प्रसाद ओक आता धर्मवीर-२, महापरिनिर्वाण, गुलकंद, पठ्ठे बापूराव, वडापाव आदी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


Comments
Add Comment

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या

Mumbai News : पिकअप चालकाने बड्या कंपनीच्या अधिकाऱ्याला केली मारहाण

मुंबई : सकाळी घाटकोपर पूर्व येथे ईस्टर्न एक्सप्रेस वे वर ओव्हरटेक करण्यावरून वाद झाला. एका पिकअप वाहनाच्या

Mumbai News : धक्कादायक! वाढदिवसाच्या केकमध्ये आढळली पाल, 11 जणांना विषबाधा; 4 जण ICUमध्ये

नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील लक्ष्मी नगर परिसरातील निळकंठ अपार्टमेंटमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान