Deep fake videos : निवडणुकीदरम्यान 'डीप फेक' रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे.


फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा चिंतेचा विषय आहे. एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात. असे गैरपद्धतीने तयार केलेले डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते.


निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.


अशा गैरप्रकारांवर त्वरीत नियंत्रण मिळविणे तसेच त्वरित कायदेशीर कारवाई सुरू करण्याच्या अनुषंगाने, अशा घटनांची गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (CID) चौकशी करण्याचे आदेश राज्य शासनामार्फत पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगानेही विपर्यस्त माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत.


Comments
Add Comment

India-Australia ODI XI : कमिन्सची ऑल-टाईम टीम जाहीर! रोहित-विराटला नाही स्थान; पॅट कमिन्सच्या टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका (ODI Series) १९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार

Vande Bharat 4.0 : वंदे भारत ४.० चा 'सुपर प्लॅन'! वंदे भारत ४.० लवकरच सुरु होणार, रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

पुढील काही महिन्यांत 'वंदे भारत ४.०' धावणार! नवी दिल्ली : प्रवाशांसाठी रेल्वे प्रवासाच्या दृष्टीने एक अत्यंत

बिहार निवडणुकीसाठी भाजपचे स्टार प्रचारक जाहीर!

मोदी, शहा, राजनाथ यांच्यासह ४० नेत्यांची यादी नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या

छत्तीसगडमध्ये १७० माओवादी आत्मसमर्पित!

छत्तीसगड : छत्तीसगड राज्यात नक्षलविरोधी लढ्यात मोठे यश मिळाले असून, तब्बल १७० माओवादी कार्यकर्त्यांनी

८१ कोटी लोकांसाठी अन्नसुरक्षा: भारत सरकारकडून जागतिक अन्न दिनानिमित्त खास योजना

नवी दिल्ली : जागतिक अन्न दिनानिमित्त भारत सरकारने देशातील ८१ कोटी नागरिकांना अन्न आणि पोषण सुरक्षा देण्याचा

Gujarat Cabinet: गुजरातमध्ये 'राजकीय भूकंप'! मुख्यमंत्री वगळता सर्व १७ मंत्र्यांचे राजीनामे; अमित शहा आजच गांधीनगरमध्ये

पटेल मंत्रिमंडळात तीन वर्षांनंतर मोठे फेरबदल; उद्या शहा-नड्डांच्या उपस्थितीत नवीन मंत्र्यांचा