SRH vs RR: सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहा दोन्ही संघांची प्लेईंग ईलेव्हन. हैदराबादचा आक्रमक सलामीवीर ट्रेव्हिस हेडने ५८ धावांची खेळी केली. नितीश रेड्डी या युवा फलंदाजांनी सर्वाधिक ७६ धावांची नाबाद खेळी केली. तर यष्टीरक्षक फलंदाज हेन्रिक क्लासेन याने ४२ धावांचं योगदान दिलं. त्याआधी अनमोलप्रीतसिंह ५ धावा करुन माघारी परतला. तर अभिषेक शर्मा याने १२ धावा जोडल्या. तर राजस्थाकडून आर अश्विन याने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
नितीश रेड्डी आणि हेन्रिक क्लासेन या जोडीने अखेरीस जोरदार फटकेबाजी करत हैदराबादला २०० पार पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी २०२ धावांचं आव्हान उभं केले.
हैदराबादच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खूपच खराब झाली. संघाने एका धावेवर जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसनची विकेट गमावली. पण यानंतर यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांच्यातील १३३ धावांच्या भागीदारीने राजस्थानला विजयाच्या जवळ आणले होते, पण तरीही संघ विजयाची नोंद करू शकला नाही.
सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्स विरुद्ध शेवटच्या बॉलवर १ रनने थरारक विजय मिळवला आहे. राजस्थानला विजयासाठी शेवटच्या बॉलवर २ धावांची गरज होती. तेव्हा हैदराबादचा बॉलर भुवनेश्वर कुमारने अचूक बॉल टाकत रोवमॅन पॉवेल याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. हैदराबादने अशाप्रकारे १ रनने रोमहर्षक विजय मिळवला. हैदराबादने यासह राजस्थानचा विजयरथ रोखला. हैदराबादने राजस्थानला विजयासाठी २०२ धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानला २० ओव्हरमध्ये ७ विकेट्स गमावून २०० धावाच करता आल्या.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…