Gajanan Maharaj : आत्मविश्वास मनी दृढ असावा…

Share
  • गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

मानसी बापट बंगलोर यांना आलेला श्री गजानन महाराजांचा अनुभव. दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी भाऊबीज असल्यामुळे, सगळ्या भावांबरोबर सकाळी बोलून घेतले. मी बंगळूरुला असल्याने, भेटायला जाणे शक्य नव्हते. व्हाॅट्सअॅपला भावांसोबतचे फोटो स्टेटस ठेवून झाले.

घरातली सकाळची कामे आवरली आणि आता बसावे म्हटले, तर आलोक माझा मुलगा म्हणाला की, “चल आई पटकन जिओ सिम घेऊन येऊ.” मला फिरायला खूप आवडते म्हणून मीही निघाले. सिम घेऊन झाले. एका मार्केटमध्ये थोडा फेरफटका मारला आणि आलोकने कबूल केल्याप्रमाणे मला ज्यूस पाजला. सकाळचे ११.४५ वाजले होते. आता ५ मिनिटांत घरी पोहोचणार तेवढ्यात घराकडे जाणाऱ्या वळणावर मोटारसायकल वाळूवरून घसरली आणि मी जोरात आपटले आणि गुडघ्याजवळ कट असा आवाज झाला आणि माझ्या पायाची संवेदनाच गेली. मुलाने ही कसाबसा तोल सावरला, त्याला पायाला खरचटले. मला इतका मानसिक धक्का बसला होता की, धक्का आणि दुखणे यात काहीच समजत नव्हते. लोक गोळा झाले, त्यांनी मला उचलून रिक्षामध्ये बसवले आणि आम्ही नर्सिंग होमकडे निघाली. प्रचंड वेदना होत असल्यामुळे काहीच सुचत नव्हते. आता पुढे आपले कसे होणार, या विचाराने मी गांगरून गेले होते. हॉस्पिटल येताच मला उचलून हॉस्पिटलमध्ये नेले. मी खूप रडत होते. हॉस्पिटलचे मुख्य डॉक्टर माझ्यावर ओरडल्यावर, तर मला अजूनच काही सुचेना. आत नेऊन सलाईनमधून क्रोसिन दिल्यावर माझ्या पायात संवेदना आली आणि मग मी थोडी रिलॅक्स झाले. तोपर्यंत मला सतत वाटत होते की, माझा पाय तुटलाय. एक्स-रे केल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, मांडी जवळचे हाड मोडलेय आणि त्याची मोठी शल्यक्रिया करावी लागेल. झाले परत मी एकदम उदास झाले. माझी रवानगी पहिल्या मजल्यावरच्या स्पेशल रुममध्ये झाली. आता तेवढ्यात माझे मिस्टर आणि सून कल्याणी देखील दवाखान्यात आले होते. प्रचंड वेदना सहन करत, मी महाराजांचा धावा करत होते. आलेली परिस्थिती स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता. फक्त एक चांगले होते की, माझ्या घरचे माझ्या पाठीशी खंबीरपणे होते आणि डॉक्टर तर अगदी देवमाणूसच.

१६ तारखेला रात्री ऑपरेशन यशस्वी झाले आणि वेदनाही कमी झाल्या. सतत महाराजांचा धावा केल्याने आणि माझ्या मित्र-मैत्रिणी, फॅमिली या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे गजानन महाराज मला २ मिनिटांसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये दिसले आणि मग माझ्या मनाने उभारी घेतली. पण म्हणतात ना, ‘सरळ जाईल, ते आयुष्य कसले.’ अचानक माझी शुगर वाढली आणि हिमोग्लोबिन कमी झाले. मग पुन्हा नवीन औषधे, पुन्हा वेगवेगळ्या चाचण्यांना सामोरे जावे लागले. त्यातूनही महाराजांनी सुखरूप बाहेर काढले. २० तारखेला सगळ्या टेस्ट्स नॉर्मल आल्यावर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि मी माझ्या घरी आले. अॅम्ब्युलन्समधून उतरले आणि मग मी वॉकरच्या साहाय्याने घरी आले, तरीही अधूनमधून मला रडायला येत होते. आपल्याच नशिबी हे असे का? असे ही वाटत होते. पण मग असा विचार केला की, महाराजांनी आपल्याला वाचवले आहे आणि आता काही झाले तरी खचून जायचे नाही. सतत नामस्मरण करत राहायचे आणि लवकरच आपल्या पायाने चालायचे. त्यासाठी माझ्यावर लक्ष ठेवायला एक नर्स ठेवली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे मी एका दिवसातच व्यवस्थित झाले.

माझ्यात प्रचंड आत्मविश्वास आला. मी पडले त्या दिवशीच नांदेडहून खास माझ्यासाठी माझ्या सुनेच्या आई आमच्याकडे आल्या. हीदेखील पूर्वपुण्याईच म्हणावी लागेल की, मला आजूबाजूला सगळी छान माणसे मिळाली आहेत. रक्ताची नाती तर करतातच, पण जोडलेली नाती सोबत आहेत. या बाबतीत मी अतिशय समृद्ध आणि धनवान आहे असे म्हणायला हरकत नाही. आपल्या सर्वांच्या सदिच्छा आणि सहकार्याने मी यातून दहा दिवसांतच बाहेर पडले आहे आणि लवकरच पूर्ण बरी होणार, यात शंका नाही. देवाचीच कृपा म्हणून मी आज तुम्हा बरोबर आहे.

Recent Posts

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

15 minutes ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

53 minutes ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

2 hours ago

World Book Day : भूतकाळासह भविष्यकाळातील दुवा म्हणजेच ‘पुस्तकं’

मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…

4 hours ago

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…

4 hours ago

समाजवादी विचारवंत ना. ग. गोरे

सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…

4 hours ago