Tuesday, July 16, 2024
Homeक्रीडाIPL 2024CSK vs PBKS: पंजाबने लावला 'चेन्नई' एक्सप्रेसला ब्रेक, कठीण बनला प्लेऑफचा ट्रॅक....

CSK vs PBKS: पंजाबने लावला ‘चेन्नई’ एक्सप्रेसला ब्रेक, कठीण बनला प्लेऑफचा ट्रॅक….

CSK vs PBKS: चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्जस हे दोन्ही संघ गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी निर्णायक विजयावर लक्ष ठेवून, एमए चिदंबरम स्टेडियमवर एका थरारक सामन्यात समोरासमोर आले. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या चेन्नई सुपर किंगसकडून अजिंक्य रहाणे आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने डावाची सुरुवात केली. या दोघांनीही सुरुवातीला सांभाळून खेळल्यानंतर मात्र आक्रमक शॉट्स खेळले. त्यामुळे त्यांनी ८ षटकात बिनबाद ६४ धावा केल्या.

चेन्नईसाठी झुंझार अर्धशतक केल्यानंतरही ऋतुराज चांगल्या लयीत खेळत होता. परंतु, १८ व्या षटकात आर्शदीप सिंगने ऋतुराजला त्रिफळाचीत केले. ऋतुराजने ४८ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ५ चौकार आणि २ षटकार मारले. ऋतुराजनंतर धोनी फलंदाजीला आला आणि त्याने १३ धावा काढल्या. विशेष म्हणजे धोनी या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर धावबाद झाला.

त्यामुळे यंदाच्या हंगामात धोनी बाद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. धोनीने ११ चेंडूत १४ धावा केल्या. दरम्यान चेन्नईला २० षटकात ७ बाद १६२ धावा करता आल्या. राहुल चहर आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद करत मधल्या षटकांमध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांना अडचणीत आणले.

चेन्नईने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी पंजाबकडून प्रभसिमरन सिंग आणि जॉनी बेअरस्टो सलामीला फलंदाजीसाठी उतरले. त्यांनी चांगली सुरुवातही केली. पण ही जोडगोळी चेन्नईसाठी पदार्पण करणाऱ्या रिचर्ज ग्लिसनने चौथ्या षटकात तोडली. त्याने प्रभसिमरनला १३ धावांवर माघारी धाडले. ऋतुराजने त्याचा झेल घेतला.

आयपीएलच्या १७ व्या हंगामात शिवम दुबेला पहिल्यांचा या सामन्यात गोलंदाजीची संधी मिळाली. ९व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या दुबेने षटकातील दुसऱ्याच चेंडूवर जॉनी बेअरस्टोला बाद केले. बेअरस्टोचा झेल यष्टीरक्षक एमएस धोनीने घेतला. बेअरस्टोने ३० चेंडूत ४६ धावांची खेळी केली.

तीन विकेट्स गमावल्यानंतर पंजाबचा डाव शशांक सिंग आणि कर्णधार सॅम करन यांनी सांभाळला. त्यांनी १८ व्या षटकात चेन्नईने दिलेले १६३ धावांचे लक्ष्य पूर्ण केले. शशांक २६ चेंडूत नाबाद २५ धावा केल्या आणि सॅम करनने २० चेंडूत नाबाद २६ धावा केल्या.

चेन्नईने पंजाबसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पंजाबने हे आव्हान 3 गडी गमावून 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. पंजाबचा हा चेन्नई विरुद्धचा सलग पाचवा विजय ठरला. तर या हंगामातील पंजाबचा चौथा विजय ठरला. तर दुसऱ्या बाजूला पराभवामुळे चेन्नईची प्लेऑफच्या हिशोबाने धाकधुक वाढली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -