CSMT local : सीएसएमटीजवळ पुन्हा एकदा लोकल रुळावरुन घसरली!

वडाळा ते सीएसएमटी वाहतूक ठप्प


मुंबई : मुंबईच्या सीएसएमटी स्थानकावरुन (CSMT Station) एक मोठी बातमी समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी २९ एप्रिलला या ठिकाणी लोकलचा (Local) एक डब्बा रुळावरुन घसरला होता. आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी लोकल रुळावरुन घसरली आहे. या पॉइंटची दुरुस्ती करुन रिकामी लोकल चालवण्यात येत होती, मात्र चाचणीदरम्यानच ही रिकामी लोकल रुळावरुन घसरली.


या घटनेमुळे हार्बर लाईनवरील (Harbour Line) वाहतूक सीएसएमटी ते वडाळा (Vadala) दरम्यान दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद झालेली आहे. जोपर्यंत लोकल पुन्हा रुळावर येत नाही, तोपर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. १ मे रोजी सुट्टी असल्याने तितकासा फटका बसला नसला तरी आजच्या दिवशी प्रवास करणार्‍यांचे यामुळे हाल झाले आहेत.


दरम्यान, हार्बर लाईनवर रुळावरुन घसरलेला डबा पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, तोपर्यंत हार्बर लाईनवरील वाहतूक विस्कळीत राहणार आहे. याशिवाय हार्बर मार्गावरील वेळापत्रक देखील कोलमडणार आहे.

Comments
Add Comment

पोलिसांनी दंड आकारल्याने झाडावर चढून तरूणाचे आंदोलन

मुंबई: मु्ंबई वाहतूक पोलिसांनी दंड आकारल्याने एका चालकाने चक्क झाडावर चढून अनोखे आंदोलन केले. तब्बल दोन तास

मुंबई मनपावर भगवा फडकवण्यासाठी शिवसेना-भाजपची मोर्चेबांधणी

समसमान जागांसाठी शिवसेना तर दीडशे प्लससाठी भाजप आग्रही मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

'आयुष'च्या ४२८५ रिक्त जागा, होमिओपथी, आयुर्वेद, युनानी अभ्यासक्रमांचे प्रवेश

महाराष्ट्र : आरोग्यविज्ञान विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सरकारी आणि खासगी महाविद्यालयांकडून राबवण्यात

शिक्षक होण्याची सुवर्णसंधी, CTETची अधिसूचना जाहीर

मुंबई : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वेळापत्रकानुसार केंद्रीय शिक्षक पात्रता

उत्तम आरोग्यासाठी महापालिका आयुक्तांनी केल्या अशा सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईकरांनी आपल्या उत्तम आरोग्यासाठी उद्यानात आणि व्यायामशाळेत श्रम घेणे गरजेचे आहे.

पक्षप्रतिमा जपण्यासाठी अजित पवार संघापासून चार हात दूरच!

मुंबई  : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम