Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे अवतरणार! कशी साधणार ही किमया?

२०२५ मध्ये सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला


मुंबई : 'ओम फट् स्वाहा' म्हटलं की मराठी प्रेक्षकांना हमखास तात्या विंचू (Tatya Vinchu) आठवतो. पाश्चात्त्य सण हॅलोवीन साजरा करतानाही तात्या विंचू कायम चर्चेत येतो हे 'झपाटलेला' (Zapatlela) चित्रपटाचं यश आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते व दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी दिग्दर्शित केलेल्या 'झपाटलेला' सिनेमाची जादू ३० वर्षांनंतर आजही कायम आहे. यातील दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी साकारलेला लक्ष्याही चांगलाच लक्षात राहिला.


सिनेमाचा दुसरा भाग 'झपाटलेला २' (Zapatlela 2) देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) लक्ष्याच्या मुलाच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र चित्रपट पाहताना कायम लक्ष्याची उणीव भासत होती. यानंतर आता चित्रपटाच्या तिसर्‍या भागाची तयारी सुरु करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या भागात प्रेक्षकांना लक्ष्याची उणीव भासणार नाही, कारण लक्ष्मीकांत बेर्डे पडद्यावर अवतरणार आहेत. आजच्या काळात सगळं काही सहज शक्य करणार्‍या एआय तंत्रज्ञानाच्या (AI Technology) मदतीने ही किमया साधली जाणार आहे.


'झपाटलेला ३' (Zapatlela 3) हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या भक्कम असणार आहे. चित्रपटाच्या अनुषंगाने काही तांत्रिक गोष्टींसाठी आपण ऑस्ट्रेलियाला जाणार असल्याचे महेश कोठारे यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. 'झपाटलेला २' मध्ये 3D तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. हा मराठीतील पहिला 3D चित्रपट ठरला होता. यानंतर आता एआयच्या मदतीने दिवंगत अभिनेत्याला पडद्यावर आणणारा देखील 'झपाटलेला ३' हा मराठीतील पहिला चित्रपट ठरु शकतो.

Comments
Add Comment

Mumbai Healthcare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी दुसऱ्यांदा घेतला मुंबईतील आरोग्य व्यवस्थेचा आढावा 

आरक्षित रूग्णशय्या तसेच केंद्रीय आरोग्य योजनांचे माहितीपर फलक रूग्णालयांनी दर्शनी भागात लावण्याचे दिले

Kalina Water Cut : मुंबईच्या रक्षकांचे पाण्याविना हाल, ऐन पावसाळ्यात कलिना पोलीस क्वार्टर्समध्ये पाणीपुरवठा खंडीत

कलिना पोलीस क्वॉटर; एक दिवस विथआउट वॉटर! मुंबई : सांताक्रुझमध्ये कलिना येथील पोलीस क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या

मुंबईच्या कनेक्टिव्हिटीला नवी चालना! मेट्रो, लिंक रोड आणि ट्विन टनेल प्रकल्पांना नवी गती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते मुंबई महानगर प्रदेश

MLA Nilesh Rane : आनंदाची बातमी, गणेशभक्तांसाठी १२ सप्टेंबरला धावणार शिवसेना एक्सप्रेस

मुंबई : कोकणात राहणाऱ्यांसाठी गणेशोत्सव आणि शिमगा अर्थात होळी हे दोन अतिशय महत्त्वाचे सण. नोकरी व्यवसायाच्या

Mumbai Anti-Narcotics Cell : मुंबईत ९ कोटी ४८ लाखांचे मेथॅम्फेटामाइन जप्त; अमली पदार्थविरोधी पथकाची मोठी कारवाई

मुंबई : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई करत मुंबई आणि ग्रेटर

Kurla Landslide : कुर्ला-राजावाडी रुग्णालयातील मृतांचा आकडा वाढला; आणखी एका तरुणाचा मृत्यू

मुंबई : कालच्या घटनेनंतर जखमी आणि मृतांची संख्या अद्ययावत करण्यात आली आहे. 13 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 1.15 वाजता