नवी दिल्ली : हिंदू विवाह हा एक संस्कार असून हा नाच-गाण्याचा, जेवणाचा किंवा दारु पिण्याचा कार्यक्रम नाही, अशी टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी. नागरत्ना यांच्या खंडपीठाने, सप्तपदी आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह मान्य नाही. नोंदणी केली, तरी हे विवाह वैध राहणार नाहीत, असा महत्वपुर्ण निर्णय दिला आहे.
हिंदू विवाह हा एक संस्कार असून विवाहाला भारतीय समाजात एक महत्त्वाची संस्था म्हणून दर्जा मिळायला हवा. तसेच तरुणांनी विवाहाचा विचार करताना भारतीय समाजात विवाह संस्था ही किती पवित्र आहे, याचा विचार करायला हवा” अपेक्षित विधी न केल्यास हिंदू विवाह अमान्य आहे. त्यामुळे अशा प्रकारचे विवाह वैध मानले जात नाहीत. हिंदू विवाह अधिनियम १९५५अंतर्गत हिंदू विवाहच्या कायदेशीर आवश्यकता आणि पवित्रतेला सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयातून अधोरेखित केले आहे.
लग्न म्हणजे ‘गाणे आणि नृत्य’ आणि ‘पिणे आणि जेवण’ किंवा अनावश्यक दबाव आणून हुंडा आणि भेटवस्तू मागण्या आणि देवाणघेवाण करण्याचा प्रसंग नाही. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत फौजदारी कारवाई केली जाऊ शकते. विवाह हा एक व्यावसायिक व्यवहार नाही, हा भारतीय समाजाचा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे जो स्त्री आणि पुरुष यांच्यातील संबंध प्रस्थापित करण्यासाठी साजरा केला जातो, जो भविष्यात वाढत्या कुटुंबासाठी पती-पत्नीचा दर्जा प्राप्त करतो.,’अशी टिप्पणीही न्यायालयाने केली आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…