सलमान खानच्या घराजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू

Share

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींपैकी अनुज थापन या आरोपीने गळफास घेऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान या आरोपीचा मृत्यू झाला.

मुंबई पोलिसांनी नुकतीच ही बातमी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली. पोलीस कोठडीत असताना अनुजने गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट निदर्शनास येताच पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.

१४ एप्रिल रोजी सलमानच्या घराबाहेर दोन व्यक्तींनी गोळीबार केला होता. पोलिसांनी या घटनेतील काही आरोपींना अटक केली आहे.

गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरील गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानची भेट घेतली. या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले होते की, “या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल. हा महाराष्ट्र आहे, ही मुंबई आहे, इथे कुठलीही टोळी नसून पूर्ण ‘अंडरवर्ल्ड’ संपले आहे. आम्ही बिश्नोईला संपवू. पुन्हा कोणीही असा हल्ला करण्याची हिंमत करणार नाही अशी कारवाई करू.”

दरम्यान, विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) या दोन आरोपींना देखील पोलिसांनी अटक केली होती. हे दोघेही बिहारमधील चंपारण येथील रहिवासी आहेत. तर पोलिसांनी केलेल्या चौकशीत सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारात वापरण्यात आलेली बंदूक सुरतमधील तापी नदीमध्ये सापडली. यावेळी काही जिवंत काडतूसही सापडले.

सलमानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या विक्की गुप्ता आणि सागर पाल या तरुणांनी चौकशीदरम्यान सांगितले होते की, सलमानच्या घरावर गोळीबार केल्यानंतर ते मुंबईहून रस्त्याने सुरतला पोहोचले होते. येथून ते रेल्वेने भुजला गेले. तेथे प्रवासादरम्यान त्यांनी रेल्वे पुलावरून पिस्तूल तापी नदीत फेकले.

Recent Posts

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

35 minutes ago

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सेलिब्रिटींचा संताप..

मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…

2 hours ago

SRH vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्स विजयाचा चौकार मारेल का?

मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…

3 hours ago

दक्षिण मुंबईतील १४ हजार इमारतींचे होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…

4 hours ago

चिपी विमानतळ विद्युतीकरणाचा प्रश्न सुटणार

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…

4 hours ago

१६ एप्रिलला लग्न आणि २२ एप्रिलला पहलगाम हल्ल्यात नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू…हदय पिळवटून टाकणारी घटना

नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…

5 hours ago