मुंबई: हाताने जेवण्याचा काही आनंदच वेगळा असतो. अनेकदा घरातली वडीलधारी मंडळी हाताने जेवण्याबाबत सांगत असतात. मात्र आजकाल हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये अनेकजण लोक चमच्याने खाऊ लागले आहेत. भारतीय परंपरेमध्ये जेवण नेहमी जमीनीवर बसून हाताने खाल्ले जाते. जर तुम्हीही जेवण हाताने जेवत असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
आयुर्वेदानुसार हाताने जेवण करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. पाचही इंद्रिये आणि पचनासाठी हे चांगले असते. आयुर्वेद सांगते की आपली पाच बोटे पाच विविध तत्वांचे प्रतिनिधित्व करतात. अशातच जेव्हा आपण हाताने जेवण करतो तेव्हा जेवणाला बोटांचा स्पर्श होतो आणि आपल्या मेंदूला असा मेसेज पाठवला जातो की आपण जेवणासाठी तयार आहोत. यामुळे पाचनक्रिया सतर्क होते आणि पोटाचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते.
विज्ञानातही हाताने जेवण करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. हाताने जेवण केल्याने पचन सुधारते. कारण हातामध्ये असे काही बॅक्टेरिया असतात जे हानिकारक नसतात मात्र पर्यावरणातील विविध हानिकारक किटाणूंपासून ते शरीराची सुरक्षा करतात. दरम्यान, जेवणाआधी हात व्यवस्थित धुतले पाहिजेत.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…