मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून महायुती सरकारने मुंबईत चांगली कामे केली आहेत. गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी केलेले काम लोकांसमोर आहे. महायुतीने केलेल्या कामांची पावती जनता देईल. पियुष गोयल यांच्यासह मुंबईतील सर्व जागा महायुती नक्की जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
उत्तर मुंबईचे भाजपाकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पियुष गोयल यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी मुंबईत विजयाचा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेकडून मुंबईत तीनही उमेदवार मराठी दिलेले आहेत. पियुष गोयल मुंबईकर आहेत. त्यामुळे पियुष गोयल अमराठी आहेत, अशा प्रकारचा आक्षेप घेता कामा नये. कोणालाही तसा आक्षेप घेण्याचा अधिकार नाही. पियुष गोयल प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
गेल्या २५ वर्षांत जेवढे काम झाले नाही, तेवढे काम दोन वर्षांत करण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे. या कामांचा परिणाम या निवडणुकीतून नक्की दिसून येईल, असे सांगत आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या काळात किती झाडे कापली गेली, याचा हिशोब त्यांनी आधी द्यायला हवा. त्यांची सत्ता येणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनात फिरणे, अशी गत आहे, असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…