
छत्तीसगड: छत्तीसगडच्या बेमेतरा येथे रविवारी रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. यात तीन मुलांसह आठ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. तर २१ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना रायपूरच्या एम्समध्ये धाडण्यात आले आहे.
बाकी जखमींवर बेमेतरा आणि सिमगा येथे सीएचसीमध्ये उपचार सुरू आहे. हा अपघात इतका भीषण होता की अनेकांना गंभीर दुखापती झाल्या. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
ही दुर्घटना बेमेतरा येथील कठिया पेट्रोल पंपाजवळ घडली. येथे प्रवाशांनी गच्च भरलेल्या पिकअप ट्रके रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टाटा ४०७ गाडीला टक्कर मारली.
#WATCH | Chhattisgarh | Five people died after a car rammed into a parked vehicle in Bemetara. The injured have been shifted to the hospital for treatment: Ranveer Sharma, Collector Bemetara pic.twitter.com/dVfLm4bwLR
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) April 28, 2024
कौटुंबिक कार्यक्रमातून परतत होते कुटुंब
पिकअप गाडीमध्ये असलेले सर्व जण एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी तिरैया येथे गेले होते. येथून ते पर्थरा या आपल्या गावी परतत होते. अपघाताची सूचना मिळताच पोलिसांची टीम आणि प्रशासनाचे अधिकारी पोहोचले.