Lok Saha Election 2024: काँग्रेस डायनासोरप्रमाणे नामशेष होईल, राजनाथ सिंहांची जोरदार टीका

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. यातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निवडणुकीच्या प्रचारातील सभेदरम्यान काँग्रेसवर तिखट प्रहार करत हल्लाबोल केला आहे.


केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी २८ एप्रिलला काँग्रेसवर जोरदार प्रहार करत काँग्रेस हा नामशेष होणारा पक्ष असल्याचे म्हटले. गुजरातच्या भावनगरमध्ये सभेला संबोधित करताना राजनाथ सिंह म्हणाले, ज्या प्रमाणे धरतीवरील डायनासोर नामशेष झाले त्याचप्रमाणे येणाऱ्या दिवसांत काँग्रेसही होईल.



मला दया येते


राजनाथ सिंह म्हणाले, देशात जी परिस्थिती आहे त्यावरून मला वाटते की यावेळेसच्या निवडणुकीत काँग्रेस संपून जाईल. आजपासून दहा वर्षांनी जेव्हा मुलांना काँग्रेसबद्दल विचारले जाईल तेव्हा त्यांना काहीच माहीत नसेल.त्यांची दुर्दशा पाहून मला दया येते. जसे डायनासोर पृथ्वीवरून गायब झाले होते तसेच काँग्रेसही गायब होईल.



याआधीही केले डायनासोरबद्दलचे विधान


याआधी राजनाथ सिंह यांनी उत्तराखंड येथील एका सभेत काँग्रेसची तुलना डायनासोरसोबत केली होती. त्यांनी म्हटले होते की ज्या पद्धतीने जगातून डायनासोर नामशेष झाले तसेच काँग्रेसही होणार आहे. त्यांनी काँग्रेस म्हणजे बिग बॉस शोचे घर असल्याचे म्हटले होते.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे