CSK VS SRH: देशपांडेने लढवली चेन्नईची खिंड, हैदराबादवर एकहाती विजय...

  53

CSK VS SRH: आयपीएल २०२४च्या ४६व्या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम फलंदाजी करण्यास सांगितले. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध प्लेईंग इलेव्हनमध्ये आपले स्थान कायम राखत, अजिंक्य रहाणेने ऋतुराज गायकवाडसोबत चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीसाठी आला होता. पण आक्रमक खेळी करताना वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने दुसऱ्याच षटकात बाद झाला.


तथापि, सुपर किंग्जचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने आपल्या जलद खेळीने चेन्नईच्य़ा धावसंख्येला गती दिली. गायकवाडने आणखी एक कर्णधार पदाला साजेशी खेळी खेळून सीएसकेला आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यास मदत केली. गायकवाडने 54 चेंडूत 98 धावा केल्या आणि अंतिम षटकात तो बाद झाल्याने धोनीचे चेपॉकवर आगमन झाले. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत, धोनी (2 चेंडूत 5) आणि शिवम दुबे (20 चेंडूत 39) यांनी सीएसकेला 20 षटकांत ३ 212 अशी मजल मारली.


हैदराबादचा ऑस्ट्रेलियन सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने चौकार मारून धावांचा पाठलाग सुरू केला. दुसरं षटक घेऊन आलेल्या तुषार देशपांडेला दोन षटकार ठोकत हैदराबादच्या सलामीवीरांना आक्रमकता दाखवली. पण लगेचंच देशपांडेने हेडची मोठी विकेट पटकवली.अनमोलप्रीत सिंग, जो हैदराबादचा इम्पॅक्ट प्लेयर होता, त्याला गोल्डन डक देत देशपांडेने पहिल्याच षटकात दोन बळी घेतले.


तुषार देशपांडेने पॉवरप्लेमध्ये हैदराबादची अव्वल फळी परत पाठवली.  देशपांडेने अभिषेक शर्मा (१५) आणि पॅट कमिन्स (५) यांनाही चांगली साथ दिल्याने हैदराबादचा १८.५ षटकांत १३४ धावांत आटोपला. चेपॉकमध्ये सीएसकेने हैदराबादवर ७८ धावांनी विजय मिळवून देत देशपांडेने कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली.


Comments
Add Comment

ENG vs IND: शुभमन गिलचे शतक, पहिल्या दिवशी भारत तीनशेपार

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून एजबेस्टनच्या मैदानावर खेळवला जात आहे. या

UAE मध्ये आशिया चषक क्रिकेट स्पर्धा

अबुधाबी : आशिया चषक क्रिकेट स्पर्धा संयुक्त अरब अमिराती अर्थात यूएई येथे होणार असल्याचे वृत्त आहे. आशियाई

Ind vs Eng: भारत वि इंग्लंड दुसऱ्या कसोटीला आजपासून सुरूवात

मुंबई: कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत

Mohammad Shami: कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोहम्मद शमीला मोठा झटका

नवी दिल्ली: कोलकाता उच्च न्यायालयाकडून क्रिकेटर मोहम्मद शमीला मोठा झटका बसला आहे. उच्च न्यायालयाने शमीला त्याची

Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या

बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने रचला इतिहास

जिंकले पहिले बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर विजेतेपद नवी दिल्ली : भारताचा युवा बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीने यूएस ओपन