Arvinder Singh Lovely : काँग्रेसला आणखी मोठा धक्का! दिल्ली प्रदेशाध्यक्षाचा पक्षाला रामराम

पदाचा राजीनामा देत सांगितले 'हे' कारण


नवी दिल्ली : लोकसभा मतदारसंघातील (Loksabha Election 2024) काँग्रेसच्या (COngress) अडचणी थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहेत. लोकसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसला प्रचंड मोठे धक्के सहन करावे लागले. काँग्रेसचा चेहरा मानला जाणाऱ्या अनेक बड्या नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडली. यामध्ये मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. तर आता दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अरविंद सिंग लवली ( Arvinder Singh Lovely resigns) यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला आहे.


काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस दीपक बाबरिया यांच्याशी मतभेद झाल्याने अरविंदर सिंग लवली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे अरविंदर सिंग लवली यांनी आपला राजीनामा देत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच दिल्लीमध्ये काँग्रेस पक्ष ज्या पक्षाच्या विरोधात होता, त्याच पक्षासोबत काँग्रेसने हातमिळवणी केली आहे. असे अरविंदर सिंग लवली यांनी म्हटले.



राजीनामा पत्रात काय म्हटले?


अरविंदर सिंग लवली यांनी स्वतःला दिल्ली पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करण्यास असमर्थ असल्याचे म्हटले आहे. दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांनी काँग्रसचे आभार व्यक्त केले. तर पक्ष पूर्वीच्या स्थितीत परत यावा यासाठी गेल्या ७-८ महिन्यांत दिल्लीत पक्षाची पुनर्स्थापना करण्यासाठी प्रयत्न केले, असे अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये जेव्हा आपल्याकडे कार्यभार सोपवण्यात आला तेव्हा पक्षाच्या युनिटची स्थिती सर्वांना माहीत आहे. तेव्हापासून विविध उपाययोजना करून पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना पुन्हा उत्साही करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले आहेत, असे अरविंदर सिंग लवली यांनी म्हटले आहे. तसेच, पक्ष सोडून गेलेल्या किंवा निष्क्रिय झालेल्या शेकडो स्थानिक कार्यकर्त्यांना आणि स्थानिक नेत्यांना पक्षात पुन्हा सामील करून घेतले, असेही अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.

Comments
Add Comment

करूर चेंगराचेंगरीत मृतांची संख्या ४० वर, करूर दुर्घटनेतील ४० पैकी ३५ मृतदेहांची ओळख पटली; टीव्हीके पक्षाची उच्च न्यायालयात स्वतंत्र चौकशीची मागणी

चेन्नई : अभिनेता आणि तमिलगा वेट्री कळघम पक्षाचे अध्यक्ष विजय यांच्या करूर येथील प्रचार सभेत झालेल्या भीषण

'मन की बात': मोदींचा स्वदेशी वस्तू वापरण्याचा आग्रह; महिला आणि परंपरांचा गौरव

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या 'मन की बात' या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या १२६ व्या भागात

पंजाब सीमेवर दोन पाकिस्तानी ड्रोन बीएसएफकडून जप्त

पाकिस्तानमधून ड्रग्ज तस्करीसाठी ड्रोनचा वापर चंदीगड : सीमा सुरक्षा दलाने भारत-पाकिस्तान सीमेवर केलेल्या

ऑक्टोबरमध्ये तब्बल २१ दिवस बँका बंद

मुंबई : पुढील महिन्यातील ऑक्टोबरमध्ये देशभरातील वेगवेगळ्या बँका एकूण २१ दिवस बंद राहणार आहेत. आरबीआयच्या

करूर दुर्घटना: विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २० लाख, जखमींना २ लाख मदत जाहीर

तामिळनाडूतील सभेतील चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू; राजकीय पक्षाच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या प्रमाणात

मध्य रेल्वे प्रशासनाची मोटरमनच्या मोबाईलवर करडी नजर

रेल्वेचे नियम, बंधनांविरोधात मोटरमनची नाराजी नवी दिल्ली : मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या