DC Vs Mi: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीचा फलंदाज फ्रेजर-मैक्गर्कने फक्त २८ चेंडूत ८४ धावा करत पावरप्लेमध्येच संघाची धावसंख्या शंभरापार लावली. त्यानंतर आलेल्या शाय होपने १७ चेंडूत ४१ धावा तर स्टब्सने २५ चेंडूत ४८ धावा करत संघाची आक्रमक खेळी सुरुच ठेवली. दिल्लीने 20 षटकात 4 गडी गमवून 257 धावा केल्या. आणि मुंबईसाठी 258 धावांचं आव्हान दिले.
दिल्लीने दिलेल्या २५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मुंबईकडून ईशान किशन आणि रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला उतरले होते. त्यांनी चांगली सुरुवातही केली होती. ईशान आक्रमक खेळत होता, तर दुसरी बाजू रोहितने सांभाळली होती. परंतु, रोहितला खलील अहमदलने बाद केले. चौथ्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शाय होपकडे झेल देत बाद झाला. रोहितने ८ चेंडूत ८ धावा केल्या.
पाचव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मुकेश कुमारने ईशान किशनचा अडथळा दूर केला. ईशानने मुकेशविरुद्ध मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु, त्याचा झेल अक्षर पटेलने घेतला. त्यामुळे ईशानला १४ चेंडूत २० धावा करून माघारी परतावे लागले. सूर्यकुमारने ३ चौकार आणि २ षटकार मारत आक्रमकता दाखवली, पण ६ व्या षटकात खलील अहमदने त्याला परत पाठवले.
अखेरच्या षटकात मुंबईला २५ धावांची गरज होती. सर्वांच्या नजरा तिलक वर्मावर खिळल्या. पण दोन धावांसाठी धावताना पंतने त्याला धावबाद केले. तिलकने ६३ धावा केल्या. त्यातच अखेरच्या चेंडूवर पीयुष चावला शाय होपकडे झेल देत 10 धावांवर बाद झाला. त्यामुळे मुंबईचा डाव 20 षटकात 9 बाद 247 धावांवर संपला. त्यामुळे हा सामना दिल्लीने 10 धावांनी जिंकला.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…