Cyber Crime : दिवसा डिलिव्हरीचे काम, रात्री सायबर गुन्ह्यांचा मामला

  60

गोलमाल - महेश पांचाळ


दिवसा डिलिव्हरी बॉयचे काम करताना, रात्री मात्र सायबर गुन्ह्यांत सहभाग असलेल्या पाच जणांच्या टोळक्याने कोट्यवधी रुपयांची लूट केली होती. सायबर गुन्ह्यांची नोंद होती; परंतु आरोपी कोण याचा शोध लागत नव्हता. गेले काही महिने मागावर असलेल्या महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पुण्यातील या टोळीचा पर्दाफाश केला आहे. ज्यांची फसवणूक केली गेली, त्यांच्या एकूण १२० बँक खात्याद्वारे सुमारे चार कोटी रुपयांची रक्कम हस्तांतरीत करून ते क्रिप्टोकरन्सीमार्फत हाँगकाँग या देशातील टोळीला पाठविण्याचे काम करत होते, अशी माहितीही पोलीस तपासात उघड झाली.


पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हे तरुण असून २० ते ३० वयोगटातील आहेत. आरोपींचे शिक्षणही दहावीपर्यंत नाही. यातील काहींनी अर्धवट शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांची आर्थिक पार्श्वभूमीही कमकुवत आहे.आरोपी विविध कुरियर आणि लंच डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यात काम करत होते. जुनेद मुख्तार कुरेशी (वय २१), सलमान मन्सूर शेख (वय २२),अब्दुल अजीज अन्सारी (वय २३), आकिफ अन्वर अन्वर खान(वय २९),तौफिक गफ्फार शेख (वय २२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सुसगाव येथील एका ४६ वर्षीय महिलेने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (एनसीसीआरपी) फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली होती. गुंतवणुकीवर जादा नफ्याचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून, या महिलेची ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. महिलेची फसवणूक करून, ज्या बँक खात्यात पैसे वळविले गेले, त्याचा उगम शोधत असताना सायबर पोलीस जुनैद कुरेशी (२१) याच्यापर्यंत पोहोचले. पीडित महिलेकडून मिळवलेली रक्कम जुनैद हाताळत असलेल्या बँक खात्यात जमा झाली होती. सायबर पोलिसांनी आरोपीचा अधिक तपास केल्यानंतर कळले की, चार आरोपींकडे जमा झालेला पैसा पाचवा आरोपी आकिफ अन्वर खान याच्याकडे दिला जात होता. आकिफ हा युएसडीटी या क्रिप्टोकरन्सीमार्फत फसवणुकीद्वारे मिळालेले पैसे हाँगकाँगमध्ये पाठवत असे.


या प्रकरणातील मुख्य आरोपी ग्रेग हा हाँगकाँग येथे वास्तव्यास असून तो तेथून फसवणुकीचे नेटवर्क चालवत असल्याची माहिती मिळाली. हाँगकाँगमधून सोशल मीडियासाठी जाहिराती आणि लिंक तयार केल्या जातात. त्या जाहिराती पाहून संपर्क साधणाऱ्यांना लगेच फोन येण्यास सुरुवात होते.


शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे सांगून गुंतवणुकीच्या बहाण्याने लाखो रुपये घेतले जातात. हे पैसे स्थानिक बँक खात्यांवर घेतले जातात. या रकमेचे चलनात रूपांतर करून हाँगकाँगला पाठवले जाते. त्यासाठी स्थानिक पातळीवर काम करणाऱ्यांना काही रक्कम दिले जाते. हाँगकाँगमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीला पुण्यातील आरोपी सहकार्य केल्यानेच कोट्यवधींची रक्कम परदेशात हस्तांतरीत झाली.


टिप : गुंतवणुकीवर जादा नफ्याचा परतावा मिळेल, अशा स्वरूपाच्या सोशल मीडियावर जाहिराती आणि लिंक आपल्या निदर्शनास आल्या तर त्याकडे दुर्लक्ष करा. गुंतवणुकींवर पैसा मिळविण्यासाठी अधिकृत कंपन्यांच्या प्रोफाईलची माहिती तपासून गुंतवणूक केल्यास धोका निर्माण होणार नाही.


maheshom108@gmail.com


Comments
Add Comment

शुभाशीर्वाद अवकाशाचे...

मनभावन : आसावरी जोशी अवकाश म्हणजे एक निर्वात पोकळी... लहानपणापासून भूगोलाच्या तासाला घोकून पाठ केलेली माहिती.

लुप्त झालेला नाट्य खजिना : भांगवाडी थिएटर

भालचंद्र कुबल : पाचवा वेद सध्या राजकीय वारे शिक्षणाच्या दिशेने वाहणाऱ्या हिंदी भाषेच्या झग्यात शिरलेत.

कलावंताला जेव्हा ‘डॉक्टराश्रय’ मिळतो...

राजरंग : राज चिंचणकर ज्येष्ठ रंगकर्मी रमेश भिडे हे रंगभूमीवर ‘मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हे नाट्य सादर करत असतात.

अभिनयासोबत निर्मिती देखील

टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल  नूतन जयंत या अभिनेत्रीने अभिनयासोबत निर्मितीच्या क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे.

प्रत्येक प्रेक्षकाने पडताळून पाहावी अशी “भूमिका”

पाचवा वेद : भालचंद्र कुबल  आज ज्या दिवशी मी ‘भूमिका’ या नाटकाचं निरीक्षण लिहितोय त्याचवेळी सध्या आणखी चार मराठी

काळी जादू...

मनभावन : आसावरी जोशी जादू... या दोन अक्षरांचे आपल्यासारख्या सामान्यांना प्रचंड आकर्षण.. अशक्यप्राय गोष्ट घडणे