ICC T20 World cup : कोहली, पांड्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान नाही!

संजय मांजरेकर यांनी निवडले भारतीय संघाचे खेळाडू


मुंबई : क्रिकेटविश्वात सध्या आयपीएलची (IPL) जोरदार चर्चा आहे. आयपीएल संपल्यानंतर लगेच आयसीसी टी-२० विश्वचषकाचे (ICC T20 World cup) सामने सुरु होणार आहेत. यासाठी भारतीय संघाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी भारतीय संघातील १५ खेळाडूंची निवड केली आहे. विशेष बाब म्हणजे विराट कोहली (Virat Kohli), हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांच्यासह रिंकू सिंग (Rinku Singh) आणि अर्शदीप सिंग (Arshadeep Singh) यांना भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. संजय मांजरेकर यांनी सलामीवीर म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जैस्वालची (Yashaswi Jaiswal) निवड केली आहे.


रोहित आणि यशस्वीनंतर तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीसाठी केएल राहुलला संधी देण्यात आली आहे. संजय मांजरेकर यांनी चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवची निवड केली आहे. तर यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत आणि संजू सॅमसनला निवडले आहे. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांना संधी दिली आहे. तर अष्टपैलू म्हणून रवींद्र जडेजा आणि कृणाल पांड्याचा समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाजीसाठी जसप्रीत बुमराह याच्यासह आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादव आणि हर्षित राणाला संधी दिली आहे.



संजय मांजरेकरांनी निवडलेला संघ पुढील प्रमाणे आहे


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, ऋषभ पंत, संजू सॅमसन, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, आवेश खान, मोहम्मद सिराज, मयंक यादव, हर्षित राणा



विश्वचषकासाठी पात्र ठरलेले २० संघ


अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा

Comments
Add Comment

पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर नौदलासोबत साजरी केली दिवाळी

पणजी : संपूर्ण देश आज दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शूर

उत्पादनांवर ‘ओआरएस’ नाव वापरण्यास मनाई

भारतीय अन्् सुरक्षा आिण मानके प्राधिकरणाचे निर्देश हैदराबाद  : अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य

मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण

चॅट जीपीटीला टक्कर देणार स्वदेशी सर्वम एआय

हिंदीसह १० भारतीय भाषांमध्ये साधणार संवाद नवी दिल्ली  : भारताच्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा

नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या

मुलगी ऐकत नसेल, तर तिच्या तंगड्या तोडा: प्रज्ञा ठाकूर

भोपाळ : “जर आमच्या मुलीने बिगर हिंदूच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिचे पाय तोडण्यात कोणतीही कसर सोडणार