Coastal Road : कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सीलिंकदरम्यान महाकाय गर्डरची यशस्वी जोडणी!

  126

अभिमानास्पद कामगिरीबद्दल बीएमसीवर कौतुकाचा वर्षाव


नवी दिल्ली : बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. महत्त्वाकांक्षी मुंबई कोस्टल रोड (Mumbai Coastal Road) प्रकल्पाने आज पहिली महाकाय तुळई (Bow Arch String Girder) यशस्वीपणे स्थापन केली. आज पहाटे मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू (Bandra-Worli sea link) मार्गाला जोडणारे गर्डर बसवण्यात आले. पहाटे २ वाजेपासून सुरू झालेली ही मोहीम पहाटे ३ वाजून २५ मिनिटांनी यशस्वीपणे पार पडली.


बीएमसीने यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर दिली आहे. बीएमसीच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, या अभियांत्रिकी कामगिरीमुळे महानगरपालिकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सदर ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी स्वतः प्रकल्प स्थळी उपस्थित होते.


कामगिरीबद्दल उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) श्री. चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) श्री. गिरीश निकम यांच्यासह मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे सर्व संबंधित अधिकारी, अभियंता, कर्मचारी यांचे महानगरपालिका आयुक्त श्री. गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ. सैनी यांनी अभिनंदन केल्याचं बीएमसीने ट्वीटमध्ये म्हटलंय.


स्थापन केलेला गर्डर हा वरळीकडून नरिमन पाईंट दिशेला जाणाऱ्या मार्गावर स्थापन करण्यात आला आहे. हा गर्डर दोन हजार मेट्रीक टन वजनाचा असून १३६ मीटर लांब आणि १८ ते २१ मीटर रुंद आहे. लवकरच दुसरा गर्डर देखील स्थापन केला जाणार आहे. त्यानंतर उर्वरित काम पूर्ण करून मुंबई किनारी रस्त्याचा पुढील टप्पा देखील सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

प्रसिद्ध मराठी कलाकार किशोर कदम यांचे मुंबईतलं घर धोक्यात! मुख्यमंत्र्यांना केले मदतीचे आवाहन, नेमकं प्रकरण काय?

कमिटी, पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमताने घोटाळा घडवल्याचा केला आरोप  मुंबई: कवी सौमित्र म्हणून प्रसिद्ध असलेले

ओप्पोने के13 टर्बो सीरिजमध्ये दोन नवे गेमिंग स्मार्टफोन केले लॉन्च

मुंबई : ओप्पोने आपल्या गेमिंग केंद्रित के13 टर्बो मालिकेत दोन नवे स्मार्टफोन के13 टर्बो प्रो

अंगारकी संकष्टी चतुर्थीसाठी मेट्रोची सेवा वाढवली!

मुंबई : १२ ऑगस्ट रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी

खेकडे पकडायला गेले आणि बुडून मेले

कांदिवलीतील तलावात खेकडे पकडताना पिता-पुत्राचा बुडून मृत्यू मुंबई : कांदिवली पूर्व येथे एका तलावात खेकडे

राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी विभागातील सर्वांनी प्रयत्न करावेत : मंत्री नितेश राणे

मुंबई : राज्यात मत्स्योत्पादन वाढीसाठी मोठ्या संधी आहेत. यंदाच्या हंगामामध्ये राज्यात ४७ टक्के मत्स्योत्पादन

ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ : मुंबईत क्रिकेट स्टार्सचा मेळावा, ट्रॉफी टूरला जल्लोषात सुरुवात

मुंबई : मुंबईत आज ‘ICC महिला क्रिकेट विश्वचषक २०२५’ च्या ‘५० दिवस बाकी’ कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील दिग्गजांची